संप मागे : जे. जे. रुग्णालय प्रकरणनागपूर : जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्या बदलीच्या मागणीसाठी राज्याच्या सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने संप पुकारला होता. मेयो व मेडिकलचे निवासी डॉक्टर शुक्रवारी सकाळी ८ वाजतापासून ‘कॉमन बंक’वर गेले होते. शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आश्वासनानंतर अखेर मार्डच्या डॉक्टरांनी आपला संप मागे घेत, सायंकाळी ६ वाजता कामावर परतले. रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.जे.जे. रुग्णालयाच्या नेत्र रोग विभागाच्या प्रमुख शस्त्रक्रिया करू देत नाहीत, सतत अपमान करतात, मानसिक त्रास दिल्या जात असल्याच्या कारणांवरून रविवारपासून तेथील निवासी डॉक्टरांनी आंदोलन उभे केले. शासनाकडून कारवाई होत नसल्याचे पाहत सेंट्रल मार्डच्या निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले. मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर शुक्रवारी सकाळी ८ वाजतापासून संपावर गेले. केवळ अपघात विभागात आपली सेवा देत होते. शासकीय रुग्णालयाचा कणा असलेले निवासी डॉक्टरच संपावर गेल्याने दोन्ही रुग्णालयाची रुग्णसेवा विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे, त्याच दिवशी संपावर गेलेल्या निवासी डॉक्टरांना रुग्णालय प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. शनिवारी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याने संप मागे घेतला. सायंकाळी ६ वाजतानंतर निवासी डॉक्टर आपापल्या कामावर परतले. वॉर्डा-वॉर्डात डॉक्टर पोहचल्याने रुग्णांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. (प्रतिनिधी)संपामुळे मेडिकल, मेयोतील १७ शस्त्रक्रिया रद्दनिवासी डॉक्टरांच्या संपामुळे मेडिकलमधील १३ आणि मेयोतील ४ शस्त्रक्रिया अशा एकूण १७ नियोजित शस्त्रक्रिया वेळेवर रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय वॉर्डातील आरोग्यसेवा सुरळीत राहावी यासाठी वरिष्ठ डॉक्टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी आलेल्या शासकीय सुटीमुळे ओपीडी बंद होती. तर दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने रुग्णांची संख्या रोडावली होती. परिणामी, रुग्णालय प्रशासनावर ताण आला नाही. रद्द झालेल्या शस्त्रक्रिया सोमवारी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सायंकाळीच डॉक्टर परतले कर्तव्यावर
By admin | Published: April 10, 2016 3:19 AM