शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

अखेर नागपूर मनपा अर्थसंकल्पाचा मुहूर्त ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 12:53 AM

अर्थसंकल्पाला पावसाळ्यापूर्वी मंजुरी मिळाली तर प्रस्तावित कामांची मंजुरी घेऊन आॅक्टोबर महिन्यात कामे सुरू करता येईल. यासाठी अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे. अखेर अर्थसंकल्पाचा मुहूर्त ठरला असून, १५ जूनपूर्वी म्हणजेच १२ तारखेच्या दरम्यान अर्थसंकल्प सादर करण्याचे संकेत स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले आहेत.

ठळक मुद्दे१५ जूनपूर्वी विशेष सभा : स्थायी समिती अध्यक्षांनीही दिले संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प १५ मेपर्यंत सादर करण्याची घोषणा स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी केली होती. त्यानुसार अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी स्थायी समितीने विविध विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. स्थायी समितीचे अधिकारी व कर्मचारी कामाला लागले होते. परंतु मे महिना संपला तरी अर्थसंकल्प सादर झाला नाही. यामुळे विकास कामे रखडल्याने नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. अर्थसंकल्पाला पावसाळ्यापूर्वी मंजुरी मिळाली तर प्रस्तावित कामांची मंजुरी घेऊन आॅक्टोबर महिन्यात कामे सुरू करता येईल. यासाठी अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे. अखेर अर्थसंकल्पाचा मुहूर्त ठरला असून, १५ जूनपूर्वी म्हणजेच १२ तारखेच्या दरम्यान अर्थसंकल्प सादर करण्याचे संकेत स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले आहेत.मागील काही वर्षांपासून वाढीव रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा सुरू आहे. याही वर्षी ती कायम राहणार आहे. परंतु मागणीनुसार जीएसटी अनुदान प्राप्त झालेले नाही. जकातही २१० कोटींच्या पुढे गेलेली नाही. अन्य विभागही उद्दिष्टापासून खूप दूर आहेत. मर्यादित उत्पन्न व वाढीव प्रस्तावित खर्च याचा ताळमेळ बसविताना स्थायी समितीला चांगलीच कसरत करावी लागली. अर्थसंकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मुखपृष्ठ निश्चित होताच छपाई सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आला असून, स्थानिक संस्था कर (एलबीटी) संपुष्टात आला आहे. शासनाकडून जीएसटी अनुदान म्हणून १०६५ कोटी मिळतील, अशी महापालिकेची अपेक्षा होती, अशी मागणीही शासनाकडे केली होती. परंतु प्रत्यक्षात हा आकडा ६०० कोटींवर थांबला. गेल्या वर्षात दर महिन्याला सरासरी ५१ कोटींचे जीएसटी अनुदान प्राप्त झाले. चालू वित्त वर्षात यात वाढ होण्याची शक्यता दिसत नाही.महापाल् िाकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता करापासून गेल्या वर्षात ३९२.९१ कोटी अपेक्षित होते. प्रत्यक्षात २१० कोटीची कर वसुली झाली. पाणीपट्टीतून १७० कोटी अपेक्षित होते. प्रत्यक्षात १३५ कोटी जमा झाले. नगर रचना विभागाकडून १०१ कोटी अपेक्षित असताना, ६० कोटीच्या पुढे आकडा सरकला नाही. शासनाकडून मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेले १४९ कोटींचे अनुदान आणि शिक्षण विभाग व मलेरिया-फायलेरिया विभागाचे ५०.६२ कोटी मिळाल्याने महापालिकेला थोडा दिलासा मिळाला. मात्र पुढील वर्षात शिक्षण विभाग व मलेरिया-फायलेरिया विभागाचे ५० कोटी मिळणार नाही.३५० कोटींच्या विशेष अनुदानाचा समावेशस्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जाधव यांनी २०१७-१८ या वर्षाचा २२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र मार्च २०१८ अखेरीस महापालिकेच्या तिजोरीत १७०० कोटींचा महसूल जमा झाला. यात शासकीय अनुदानाचा मोठा वाटा आहे. अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात जवळपास ५५० कोटींची तफावत आहे. परंतु पुढील वर्षात शासनाकडे ३५० कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी केली जाणार आहे. अपेक्षित अनुदान गृहित धरून प्रस्तावित अर्थसंकल्प २७०० कोटींच्या आसपास राहणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudget 2018अर्थसंकल्प २०१८