लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंबाखू खाणाऱ्या १०० लोकांमधून सुमारे ३३ जणांना कॅन्सर होण्याचा धोका असतो. गाल, जीभ, ओठ, टाळू, हिरड्या, जीभेखालील भाग अशा तोंडाच्या कोणत्याही भागात हा रोग होऊ शकतो. म्हणूनच तंबाखू खाणारा प्रत्येक व्यक्ती ‘डेंजर झोन’मध्ये असतोच. अनैच्छिक धूम्रपानामुळे (पॅसिव्ह स्मोकिंग) ३५ टक्के लोकांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर रुग्णालयाच्या निरीक्षणात आढळून आले आहे. यामुळे तंबाखूविषयी व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर रुग्णालयाच्यावतीने पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरवर प्रकाश टाकला. रुग्णालयाचे संचालक डॉ. सुभ्रजित दासगुप्ता म्हणाले, ‘इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) २०२० पर्यंत भारतात कर्करोगाचे १७ लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येण्याचे व यातील आठ लाख रुग्णांचा मृत्यू होण्याचा इशारा दिला आहे. देशात तंबाखूजन्य पदार्थाचे वाढते सेवन आणि वाढते धूम्रपान हे त्याचे प्रमुख कारण ठरणार आहे.चार वर्षांत ६५३ फुफ्फुसाच्या कॅन्सरचे रुग्ण-डॉ. दासगुप्ताडॉ. दासगुप्ता म्हणाले, रुग्णालयात २०१४ ते २०१८ या कालावधीत ६५३ फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांचा इतिहास पाहिला तर ३५ टक्के रुग्ण हे स्वत: धूम्रपान करीत नव्हते, परंतु ‘पॅसिव्ह स्मोकिंग’ व प्रदूषणामुळे त्यांना कॅन्सर झाल्याचे सामोर आले आहे.तरुणींमध्ये वाढतेय धूम्रपान-डॉ. शर्मारुग्णालयाचे सहसंचालक डॉ. बी.के. शर्मा म्हणाले, तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये ३० ते ५० वयोगटातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे धक्कादायक आहे. सोबत ग्रामीणच्या तुलनेत शहरातील तरुणींमध्ये धूम्रपानाचे व्यसन वाढत आहे. सध्या पुरुष आणि महिलांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण ८० आणि २० आढळते, परंतु पुढे ही संख्या शहरात लवकरच समसमान होण्याची शक्यता आहे.वेदना, सूज व गाठीकडे लक्ष द्या-डॉ. सप्रेडॉ. एस.बी.सप्रे म्हणाले, मान, चेहरा व घसा यामध्ये जास्त वेदना, सूज किंवा गाठी असणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दीर्घकाळ बरा न होणारा खोकला, आवाजातील बदल, तोंडात, घशात लाल किंवा पांढरे चट्टे यापैकी कोणतेही एक लक्षण तीन आठवडे दिसत असल्यास तो घसा व तोंडाचा कर्करोग असू शकतो.
तंबाखू खाणारा प्रत्येक व्यक्ती ‘डेंजर झोन’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:14 PM
तंबाखू खाणाऱ्या १०० लोकांमधून सुमारे ३३ जणांना कॅन्सर होण्याचा धोका असतो. गाल, जीभ, ओठ, टाळू, हिरड्या, जीभेखालील भाग अशा तोंडाच्या कोणत्याही भागात हा रोग होऊ शकतो. म्हणूनच तंबाखू खाणारा प्रत्येक व्यक्ती ‘डेंजर झोन’मध्ये असतोच. अनैच्छिक धूम्रपानामुळे (पॅसिव्ह स्मोकिंग) ३५ टक्के लोकांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर रुग्णालयाच्या निरीक्षणात आढळून आले आहे. यामुळे तंबाखूविषयी व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ठळक मुद्दे१०० मधून ३३ जणांना कॅन्सरचा धोका : अनैच्छिक धूम्रपानामुळे ३५ टक्के फुफ्फुसाचा कॅन्सर