शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

प्रत्येक आठवड्यात ‘मेंटेनन्स’ तरीही विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:56 AM

महावितरणने ‘हीट अ‍ॅक्शन प्लँट’अंतर्गत सकाळी ११ वाजेनंतर ‘मेंटेनन्स’साठी वीज बंद केली जाणार नाही, अशी घोषणा केली. परंतु असे कुठले मेंटेनन्स आहे जे दर बुधवारी केल्यानंतरही पूर्ण होत नाही आणि हवामानात थोडाही बदल झाला तरी वीज वितरण यंत्रणा कोलमडून पडते? हा प्रश्न निर्माण होतो. मेंटेनन्सच्या नावावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या थट्टेमुळे नागरिकांसोबतच उद्योगांचेही हाल होत आहे. बुटीबोरीसारख्या महत्त्वपूर्ण औद्योगिक क्षेत्रातील विजेचा लपंडाव हा लहानसहान कारणांमुळे नेहमीचीच बाब झाली आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्यात महावितरण देत आहे त्रास : बुटीबोरीतील अनेक उद्योग प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणने ‘हीट अ‍ॅक्शन प्लँट’अंतर्गत सकाळी ११ वाजेनंतर ‘मेंटेनन्स’साठी वीज बंद केली जाणार नाही, अशी घोषणा केली. परंतु असे कुठले मेंटेनन्स आहे जे दर बुधवारी केल्यानंतरही पूर्ण होत नाही आणि हवामानात थोडाही बदल झाला तरी वीज वितरण यंत्रणा कोलमडून पडते? हा प्रश्न निर्माण होतो. मेंटेनन्सच्या नावावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या थट्टेमुळे नागरिकांसोबतच उद्योगांचेही हाल होत आहे. बुटीबोरीसारख्या महत्त्वपूर्ण औद्योगिक क्षेत्रातील विजेचा लपंडाव हा लहानसहान कारणांमुळे नेहमीचीच बाब झाली आहे.विशेष म्हणजे महावितरणतर्फे दर बुधवारी मेंटेनन्सच्या नावाखाली अनेक तास वीज बंद ठेवली जाते. प्रत्येक भागात वीज बंद असते. वीज बंद राहणार असल्याचे मॅसेज पाठून ग्राहकांना माहिती दिली जाते. वीज वितरण यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे. परंतु त्याचा पाहिजे तसा परिणाम होताना दिसून येत नाही. ग्राहकांना २४ तास वीज मिळत नाही आहे. बुटीबोरीचेच उदाहरण घेतले तर ‘ट्रिपिंग’ सामान्य बाब झाली. दिवसा पाच ते दहा मिनिटांसाठी वीज जाणे सामान्य बाब झाली आहे. इतकेच नव्हे तर आठवड्यात सरासरी एक दिवस तासन्तास ‘शटडाऊन‘ हेही ठरलेले आहे. रविवारी रात्रीसुद्धा असेच झाले. अनेक तासासाठी वीज बंद होती. हे सर्व तेव्हा होत आहे, जेव्हा दर आठवड्याला वीज वितरण यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी अनेक तासांचे ‘मेंटेनन्स’ होत आहे. नियमानुसार यादरम्यान वीज उपकरणांचे नट आदी टाईट केले जायला हवे. वीज लाईनवर झाडे किंवा झाडांच्या फांद्या पडू नये म्हणून फांद्या छाटण्यात येतात. परंतु सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार असे होताना दिसून येत नाही. कर्मचारी केवळ टाइमपास करीत असतात. वीज लाईनच्या आजूबाजूला झाड्यांच्या वेढलेल्या फांद्या याचे संकेतही देतात. याच निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.प्रत्येक आठवड्यात मेंटेनन्स तरीही विजेचा लपंडावउद्योगांनी नोंदविली तक्रारबुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने महावितरणकडून रोज होणाऱ्या ‘ट्रिपिंग’(वीज बंद होणे)ची तक्रार केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर यांनी सांगितले की, रोज एक किंवा दोनवेळा ट्रिपिंगमुळे उद्योगांना ‘मॅन पॉवर’सह ‘मॅन हॉवर’चेही नुकसान होत आहे. महावितरण दावा करीत आहे की, परिस्थिती सुधारण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. उद्योगांना त्याची प्रतीक्षा आहे.‘त्रुटी’ शोधण्यास लागले १५ तासबुटीबोरीमध्ये रविवार-सोमवारच्या दरम्यान रात्री जवळपास २.३० वाजता वीज गेली. महावितरणच्या माहितीनुसार सिडको कॉलनीला वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही अंडरग्राऊंड लाईनमध्ये त्रुटी आली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्या ठिकाणी अंधार खूप असल्याने नेमकी त्रुटी लक्षात येऊ शकली नाही. त्यामुळे दुसऱ्या फिडरवरून वीज पुरवठा करण्यात आला. सोमवारी दुपारी ३ वाजता त्रुटी कुठे आहे, याचा शोध लागला. यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झाले. सायंकाळी ५ वाजता दुरुस्ती करून फिडरशी पुन्हा जोडण्यात आले.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन