स्वीपर कॉलनी येथील लग्नसमारंभात २०० नागरिक सहभागी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सतरंजीपुरा झोन क्षेत्रातील स्वीपर कॉलनी येथील रहिवासी राजेश समुंद्रे यांच्याकडे बुधवारी लग्नसमारंभ होता. यासाठी १५० ते २०० नातेवाइकांची गर्दी जमवल्याने त्यांना मनपाच्या एनडीएस पथकाने ५० हजार रुपये दंड आकारला होता. गर्दीमुळे संक्रमणाचा धोका असल्याने या लग्न समारंभात सहभागी झालेल्या वर-वधुपक्षाकडील सर्वांची सोमवारी कोरोना चाचणी केली जाणार आहे. यासाठी मनपाच्या कोरोना टेस्टींग मोबाईल लॅबद्वारे अॅन्टिजेन व आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार आहे. यासंदर्भात सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे यांनी राजेश समुद्रे यांना पत्र दिले असून, लग्नात सहभागी झालेल्या सर्वांची कोरोना चाचणी करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
....