सर्वांना दर्जेदार जीवन जगण्याचा अधिकार, पत्नी व तीन अपत्यांना 16 हजार रुपयांची खावटी, उच्च न्यायालयाचा निर्णय

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: February 6, 2023 01:01 PM2023-02-06T13:01:00+5:302023-02-06T13:01:25+5:30

न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. अपत्यांमध्ये दोन मुली व मुलाचा समावेश आहे.

Everyone has the right to live a quality life, Rs 16,000 compensation to wife and three children, High Court decision | सर्वांना दर्जेदार जीवन जगण्याचा अधिकार, पत्नी व तीन अपत्यांना 16 हजार रुपयांची खावटी, उच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वांना दर्जेदार जीवन जगण्याचा अधिकार, पत्नी व तीन अपत्यांना 16 हजार रुपयांची खावटी, उच्च न्यायालयाचा निर्णय

googlenewsNext

नागपूर : निवृत्त शिक्षकाच्या पत्नी व तीन अपत्यांना एकूण १६ हजार रुपयांची मासिक खावटी मंजूर करणे अयोग्य आहे, असे म्हणता येणार नाही. शिक्षकाची पत्नी व अपत्यांच्या नात्याने ते आतापर्यंत दर्जेदार जीवन जगत आले आहेत. त्यामुळे पुढेही त्यांना समान जीवन जगण्याचा अधिकार आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले, तसेच या खावटीविरुद्ध संबंधित शिक्षकाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. अपत्यांमध्ये दोन मुली व मुलाचा समावेश आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्याच्या शहरात राहत आहेत. सुरुवातीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ४ डिसेंबर २०१५ रोजी पत्नीला ४ हजार व तीन अपत्यांना प्रत्येकी २ हजार, अशी एकूण १० हजार रुपये मासिक खावटी मंजूर केली होती. त्यानंतर १ ऑक्टोबर २०२१ रोजी पत्नीला २ हजार ५००, मोठ्या मुलीला २ हजार, धाकट्या मुलीला १ हजार, तर मुलाला ५०० रुपये खावटी वाढवून देण्यात आली.  त्यामुळे एकूण मासिक खावटी १६ हजार रुपये झाली. 

...यामुळे शिक्षकाला दिलासा देण्यास नकार
- त्यावर शिक्षकाचा आक्षेप होता. सत्र न्यायालयानेही ही खावटी कायम ठेवल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 
- उच्च न्यायालयानेदेखील पत्नी व अपत्यांचा तालुक्याच्या ठिकाणचा रहिवास, वाढलेली महागाई, शिक्षकाला निवृत्तीनंतर मिळालेले आर्थिक लाभ, त्याचे निवृत्तिवेतन, अपत्यांचे शिक्षण इत्यादी बाबी लक्षात घेता शिक्षकाला दिलासा देण्यास नकार दिला.
 - १६ हजार रुपयांची मासिक खावटी अदा करणे, शिक्षकाच्या क्षमतेबाहेर नाही, असे न्यायालय म्हणाले.

Web Title: Everyone has the right to live a quality life, Rs 16,000 compensation to wife and three children, High Court decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.