शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
5
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
6
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
7
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
8
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
9
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
10
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
11
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
12
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
13
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
14
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
15
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
16
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
17
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
18
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
20
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम

सर्वांना दर्जेदार जीवन जगण्याचा अधिकार, पत्नी व तीन अपत्यांना 16 हजार रुपयांची खावटी, उच्च न्यायालयाचा निर्णय

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: February 06, 2023 1:01 PM

न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. अपत्यांमध्ये दोन मुली व मुलाचा समावेश आहे.

नागपूर : निवृत्त शिक्षकाच्या पत्नी व तीन अपत्यांना एकूण १६ हजार रुपयांची मासिक खावटी मंजूर करणे अयोग्य आहे, असे म्हणता येणार नाही. शिक्षकाची पत्नी व अपत्यांच्या नात्याने ते आतापर्यंत दर्जेदार जीवन जगत आले आहेत. त्यामुळे पुढेही त्यांना समान जीवन जगण्याचा अधिकार आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले, तसेच या खावटीविरुद्ध संबंधित शिक्षकाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. अपत्यांमध्ये दोन मुली व मुलाचा समावेश आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्याच्या शहरात राहत आहेत. सुरुवातीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ४ डिसेंबर २०१५ रोजी पत्नीला ४ हजार व तीन अपत्यांना प्रत्येकी २ हजार, अशी एकूण १० हजार रुपये मासिक खावटी मंजूर केली होती. त्यानंतर १ ऑक्टोबर २०२१ रोजी पत्नीला २ हजार ५००, मोठ्या मुलीला २ हजार, धाकट्या मुलीला १ हजार, तर मुलाला ५०० रुपये खावटी वाढवून देण्यात आली.  त्यामुळे एकूण मासिक खावटी १६ हजार रुपये झाली. 

...यामुळे शिक्षकाला दिलासा देण्यास नकार- त्यावर शिक्षकाचा आक्षेप होता. सत्र न्यायालयानेही ही खावटी कायम ठेवल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. - उच्च न्यायालयानेदेखील पत्नी व अपत्यांचा तालुक्याच्या ठिकाणचा रहिवास, वाढलेली महागाई, शिक्षकाला निवृत्तीनंतर मिळालेले आर्थिक लाभ, त्याचे निवृत्तिवेतन, अपत्यांचे शिक्षण इत्यादी बाबी लक्षात घेता शिक्षकाला दिलासा देण्यास नकार दिला. - १६ हजार रुपयांची मासिक खावटी अदा करणे, शिक्षकाच्या क्षमतेबाहेर नाही, असे न्यायालय म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय