लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत कॅम्पस क्लब व जेसीआय वुमन्स वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरसिटी स्पीड स्केटींग स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते.गांधीनगर येथील कॉर्पोरेशन कॉलनीतील एनआयटीच्या स्केटींग ट्रॅकवर ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत स्केटर्सच्या वेगाचा थरार बघून सर्वच अचंबित झाले होते. ४ वर्षाच्या बालकापासून युवकांनीसुद्धा स्पर्धेत आपले हुनर दाखविले. बिगिनर्स, क्वाडस, बेसिक इनलाईन व इनलाईन या श्रेणीत ७ वर्ष वयोगटात ही स्पर्धा झाली. सर्वच विजेत्यांना पदक प्रदान करण्यात आले. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने स्केटर्स जमले होते. यावेळी मॅराथॉन विजेते व जेसीआयचे सदस्य राजेंद्र जायस्वाल व नागपूर जिल्हा रोलस स्केटींग असोसिएशनचे सचिव उपेंद्र वर्मा उपस्थित होते. सोबतच रीना मदान, लवली सिंह, प्रकल्प संचालक गुरप्रित तुली, सुखविंदर सिंह तुली, मुख्य समन्वयक निशांत तभाने व आशियायी खेळात कांस्य पदक प्राप्त केलेले निखिलेश तभाने, जेसीआय वुमन वर्ल्डची अध्यक्ष जीना पुरी, सचिव पिंकी चिलोत्रा, सदस्य टीना जुनेजा, लवली अहलुवालिया, रीना सुरी, टीना सोहेल, हरजित कौर, चित्रा आदी उपस्थित होते.हे ठरले विजेतेबिगिनर्स श्रेणीत मुलांमध्ये अनय सिन्हा, आराध्य इटनकर, रोहन बढे, मो. कैफ, ईशांत पानतावणे, सम्यक प्रथम राहिले. तर मुलींमध्ये आदिती साळवे, हंसिका प्राय, स्वरा लांजेवार, श्रृती मौंदेकर, यशस्वी पाटील प्रथम राहिले.क्वाड्स श्रेणीत मुलांमध्ये अक्षत बडुकले, पार्थ भानुसे, शार्विल पांडिलवार, अजिंक्य कोपरकर, वेदांत बोरकर, चिन्मय बारिकर, योगेश घोडमारे प्रथम राहिले. मुलींमध्ये सान्या कालरा, रितिशा पेठे, सांची पराते, प्रिशा बाहेती, क्षितिजा सिंह, समृद्धी पाटील, रिद्धी बाहेती प्रथम आले.बेसिक इनलाईन श्रेणीत मुलांमध्ये पार्थ अवचट, आयुष सोनटक्के व मुलींमध्ये सकीना रबरस्टॅपवाला प्रथम आले.इनलाईन श्रेणीत मुलांमध्ये सुखविंदर सिंह तुली, वेदांत के. मजिन मेनन, अयान सैयद व मुलींमध्ये राणी साखरे, जारा सेठ, चैतन्या जयस्वाल प्रथम आले.
स्केटर्सच्या वेगाने केले सर्वांना अचंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:28 AM
लोकमत कॅम्पस क्लब व जेसीआय वुमन्स वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरसिटी स्पीड स्केटींग स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते.गांधीनगर येथील कॉर्पोरेशन कॉलनीतील एनआयटीच्या स्केटींग ट्रॅकवर ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत स्केटर्सच्या वेगाचा थरार बघून सर्वच अचंबित झाले होते.
ठळक मुद्देइंटरसिटी स्पीड स्केटिंग स्पर्धेत दाखविला हुनरलोकमत कॅम्पस क्लब व जेसीआय वुमन्स वर्ल्डचे आयोजन