शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

गोकुळाष्टमीनिमित्त उपराजधानीतील बाजारात उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:15 AM

गोकुळाष्टमी सण पारंपरिकरीत्या यावर्षी शनिवारी आणि रविवारी साजरा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त बाजारात उत्साह आहे.

ठळक मुद्दे सजावटीच्या वस्तू महागल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्णाच्या जन्मसोहळ्याचा उत्सव. गोकुळाष्टमी सण पारंपरिकरीत्या यावर्षी शनिवारी आणि रविवारी साजरा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त बाजारात उत्साह आहे. मूर्तिकारांपासून ते सजावटीच्या वस्तू विक्रेत्यांमध्ये आनंद आहे. महागाईनंतरही भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.मूर्तिकार विनोद सूर्यवंशी यांनी सांगितले की, यावर्षी रंग, माती आणि वाहतुकीचे दर वाढल्यामुळे मूर्तींच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. मूर्ती आकारानुसार ५०० ते ५ हजारांपर्यंत आहेत. नागपुरात अनेकांच्या घरी परंपरेनुसार हा सण दोन, तीन आणि पाच दिवस साजरा करण्यात येतो. लोक मूर्तिकारांकडे मातीच्या मूर्तीसाठी पूर्वीच नोंदणी करतात. शनिवारी सायंकाळी श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना होणार असल्यामुळे लोकांची लगबग वाढली आहे. प्रदूषण वाढविणाऱ्या पीओपी मूर्तीची विक्री प्रशासनाने बंद करावी, असे सूर्यवंशी म्हणाले.सजावटीच्या वस्तूंचे विक्रेते श्रीधर शास्त्रकार म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्तीच्या सजावटीच्या वैविध्यपूर्ण वस्तू बाजारात आल्या आहेत. शिवाय दरही वाढले आहेत. १० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत किंमत आहे. सण साजरा करणारा सामान्य माणूस जुन्याच वस्तूने सजावट करीत असल्यामुळे तो नवीन वस्तू फार कमी खरेदी करतो. यावर्षी बाजारात चीनच्या वस्तूंची रेलचेल आहे. या वस्तू स्वस्त आणि दिसायला सुंदर आहेत.महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, तुलनात्मकरीत्या यावर्षी पूजेच्या फुलांच्या किमतीत २० टक्के वाढ झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक येथील फुले मुंबई आणि नागपुरात विक्रीसाठी जातात. पण या ठिकाणी यावर्षी मुसळधार पाऊस आणि पुरामुळे फुलांच्या उत्पादनांवर परिणाम झाला आहे. याशिवाय विदर्भात पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे लागवडही उशिरा झाली. त्यामुळे उत्पादन गणेशोत्सवानंतर येण्याची अपेक्षा आहे. बाजारात अन्य जिल्ह्यातून आणि काही स्थानिक उत्पादकांकडून कमी आवक आहे. लाल व पिवळ्या झेंडूची फुले ८० ते १२० रुपये किलो, हैदराबादी लाल गुलाब १५० ते २०० रुपये किलो, निशिगंधा २०० ते ३०० रुपये, जाईजुई ५०० ते ७०० रुपये किलो आहे. पूजेसाठी या फुलांना जास्त मागणी आहे.रणनवरे म्हणाले, समारंभात कृत्रिम फुलांची सजावट करण्यात येत असल्यामुळे कट फ्लॉवरची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कारागीर बेकार झाले आहेत. शासनाने यावर प्रतिबंध आणावा. असोसिएशनने याची तक्रार प्रदूषण मंडळाकडे केली आहे.

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमी