शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
“भाजपातून ८० टक्के लोक आमच्याकडे”; शरद पवारांच्या विधानावर महायुतीतील मंत्र्यांचा पलटवार
3
एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; न्यूयॉर्कला जाणारे विमान दिल्लीत उतरविले
4
काय आहे PM Internship Scheme? Reliance सह 'या' बड्या कंपन्यांमध्ये 'इंटर्न' होता येणार!
5
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
6
सावधान! Amazon कडून 'हॅक' झालेला मोबाईल आला, महिलेचा डेटा हॅकर्सकडे गेला; पुढे काय घडलं?
7
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
Babar Azam ला डच्चू! पाक क्रिकेटरनं काढली Virat Kohli ची आकडेवारी, अन्...
9
Pashankush Ekadashi 2024: आजच्याच दिवशी झाली होती राम-भरताची भेट; चित्रकूट पर्वतावर आहेत पुरावे!
10
Balu Mama Jayanti: निस्सीम ईश्वरभक्त बाळू मामा यांची जयंती; त्यांना संचारी संत का म्हणत? जाणून घ्या!
11
Noel Tata News : अमेरिकेतून शिक्षण, सांभाळली वडिलांची गादी... कोणत्या श्रीमंत कुटुंबातील आहेत नोएल टाटांच्या सून?
12
भौम प्रदोष: ९ राशींचे महादेव मंगलच करतील, नवनवीन संधी; नोकरीत बढती-पगारवाढ, व्यापारात भरभराट
13
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
14
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
15
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
16
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
17
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
18
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
19
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
20
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?

बंधपत्रित अधिपरिचारिकांचा परीक्षेवर बहिष्कार

By admin | Published: July 18, 2016 2:43 AM

नियमित सेवाभरतीसाठी आवश्यक असलेल्या विशेष लेखी परीक्षेला बंधपत्रित अधिपरिचारिकांनी विरोध दर्शवीत रविवारी बहिष्कार टाकला.

उपसंचालक आरोग्य कार्यालयासमोर निदर्शने : परीक्षेत ५० टक्केच उपस्थिती नागपूर : नियमित सेवाभरतीसाठी आवश्यक असलेल्या विशेष लेखी परीक्षेला बंधपत्रित अधिपरिचारिकांनी विरोध दर्शवीत रविवारी बहिष्कार टाकला. उपसंचालक आरोग्य विभाग कार्यालयातील परीक्षा केंद्रासमोर नारे-निदर्शने केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बंधपत्रित अधिपरिचारिकांची नियमित सेवाभरती करण्यासाठी १५ एप्रिल २०१५ च्या आदेशानुसार रविवारी उपसंचालक आरोग्य विभाग कार्यालयात विशेष लेखी परीक्षा घेण्यात आली. परंतु ही अट अन्यायकारक असून महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशनने याला विरोध दर्शवीत जोरदार नारेबाजी केली. असोसिएशनच्या रजनी लोखंडे म्हणाल्या, विभागीय निवड मंडळ समितीमार्फत मुलाखत व परीक्षा देऊनच बंधपत्रित अधिपरिचारिकांची निवड करण्यात आली. निवड झालेल्यांना शासनाच्या आदेशानुसार १८ महिन्यांचे बंधपत्र देण्यात आले. या कालावधीत ग्रामीण भागात समाधानकारक कार्य केल्यानंतर इच्छुकांना वेळीच सेवा नियमितता प्रमाणपत्र देणे अपेक्षित होते. परंतु १५ ते २० वर्षे शासकीय सेवेत कार्यरत असतानाही नियमिततापासून वंचित ठेवले. परिणामी, वरिष्ठ शिक्षण कालबद्ध पदोन्नती, आंतरमंडळ बदली सेवेपासून वगळण्यात आले. विशेष म्हणजे, सार्वजनिक आरोग्य विभाग महासंचालकांनी २००३ च्या आदेशान्वये अर्ध्याअधिक अधिपरिचारिकांना नियमित केले. परंतु याच कालावधीतील राज्यभरातील १०५९ बंधपत्रित अधिपरिचारिकांना यातून वगळण्यात आले. याविरोधात आंदोलन उभारल्यानंतर १५ एप्रिल २०१५ रोजी आदेश काढण्यात आले. यात बंधपत्रित अधिपरिचारिकांसाठी तीनवेळा विशेष लेखी परीक्षा घेण्याचा, यात उत्तीर्ण न झालेल्यांची सेवा समाप्त करण्याचा आणि पास झाल्यास त्याची सेवाज्येष्ठता डावलून नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु अधिपरिचारिका अखंडित सेवा देत असताना, आता परीक्षेचे वयही राहिले नसताना, नियमित सेवाभरतीसाठी विशेष लेखी परीक्षा देण्याची अट अन्यायकारक असल्याने याला विरोध करीत आहे. यासंदर्भातील लेखी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्यमंत्री, प्रधान सचिव व संचालकांना देण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या. बंधपत्रित अधिपरिचारिकांनी विशेष लेखी परीक्षेला विरोध केला असला तरी १८७ पैकी ५० टक्के उमेदवार परीक्षेला बसले. सायंकाळी यात पास झालेल्यांची यादीही जाहीर करण्यात आली. (प्रतिनिधी)