सखी महोत्सव : लोकमत सखी मंच, भोजवानी फूडस् व बिरला सनलाईफ इन्श्योरन्सचे आयोजननागपूर : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमत सखी मंचतर्फे राज्यातील विविध शहरांत सखींच्या प्रतिभांना उजाळा मिळावा म्हणून व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच कडीत सखी मंचतर्फे नुकतेच ग्रामीण क्षेत्रातील प्रतिभांना ‘जिल्हास्तरीय सखी महोत्सव-२०१७’साठी आमंत्रित केले होते. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल, कळमेश्वर, मोहपा, सावनेर, कोराडी, खापरखेडा, कामठी, येरखेडा, बेला, बुटीबोरी, उमरेड व नागपूर ग्रामीण या क्षेत्रातून आलेल्या लोकमत सखी मंचच्या सदस्यांनी एकल नृत्य, एक अंकी नाटक, रांगोळी, गीतगायन, काव्यपाठ व समूह नृत्य स्पर्धेत उत्साहात सादरीकरण केले. लोकमत सखी मंच व भोजवानी फूडस् यांच्यावतीने आयोजित व बिरला सनलाईफ इन्श्योरन्सद्वारा प्रायोजित ‘सखी महोत्सव २०१७’चे वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. भोजवानी फूडस्चे मॅनेजिंग डायरेक्टर आकाश भोजवानी व बिरला सनलाईफ इन्श्योरन्सच्या नागपूर शाखेचे प्रमुख दिव्य खरे, परेश कुलकर्णी, स्नेहांचलच्या संचालिका डॉ. रोहिणी पाटील, गायिका सुरभी ढोमणे, समुपदेशक सना पंडित, प्रियल शहा, साहित्यकार डॉ. माणिक वड्याळकर, साहित्यिक डॉ. प्रज्ञा देशपांडे, शिक्षिका नीलिमा हिंगे, गुजराती महिला समाजाच्या चारू देसाई प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन संयोजिका नेहा जोशी यांनी केले. अॅटिट्यूड डिझाईन्स दिशा डुंभिरे यांचा सहयोग होता.(प्रतिनिधी)रॅलीद्वारे दिला सामाजिक संदेशसकाळी रॅली काढून सखी महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी सखींनी त्यांच्या विशेषतांचे भव्य सादरीकरण केले. यामध्ये ग्रंथदिंडी पथक, कोराडी देवीच्या चित्ररथात प्लास्टिक खाणारा राक्षस, सेनेचे जवान व नागपूरची वधू दर्शविणारे चित्ररथ आकर्षक ठरले.स्वाभिमान कार्यक्रमाची दिली माहितीयावेळी बिरला सनलाईफ इन्श्योरन्सचे शाखाप्रमुख दिव्य खरे यांनी बिरला सनलाईफ इन्श्योरन्सतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘स्वाभिमान कार्यक्रमा’बाबत माहिती दिली. गृहिणी, नोकरीपेशा किंवा व्यवसाय करणाऱ्या महिला स्वाभिमान कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक रूपाने आत्मनिर्भर होऊ शकतात. स्वत: आत्मनिर्भर होऊन कुटुंबाचीही मदत करू शकतात. स्वाभिमान कार्यक्रमाशी जुळण्यास इच्छुक महिलांनी बिरला सनलाईफच्या धरमपेठ येथील कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान सखींना विविध प्रश्न विचारण्यात आले व योग्य उत्तर देणाऱ्यांना पुरस्कारही देण्यात आले.स्पर्धेचे निकालएकपात्री अभिनय स्पर्धा : प्रथम चित्रलेखा नखाते खापरखेडा, द्वितीय अनिता हलवे बुटीबोरी, तृतीय सुचिता अंचलवार येरखेडा, प्रोत्साहन- कल्पना कनोजे.गायन : प्रथम भावना गहूकर मोहपा, तृतीय कामिनी बंसोड नागपूर, प्रोत्साहन दीप्ती चरखे कोराडी.रैली : प्रथम कोराडी, द्वितीय खापरखेडा, तृतीय-येरखेडा.उत्कृष्ट संघ : प्रथम सावनेर, द्वितीय बुटीबोरी, तृतीय नरखेड, चौथा नागपूर. एकल नृत्य : प्रथम वैशाली वाघमारे, द्वितीय सरिता राघोर्ते, तृतीय शिवानी बन कोराडी, प्रोेत्साहन वर्षा श्रीवास्तव सावनेर.रांगोळी : प्रथम राधा अतकरी नागपूर, द्वितीय नीलिमा निस्ताने बेला, तृतीय - नंदा पाटील बुटीबोरी, प्रोत्साहन मनुश्री मारमाते कोराडी.स्वरचित कविता : प्रथम - रेवती काळे नरखेड, द्वितीय - अरुणा डांगोरे मोहपा, तृतीय वैशाली तळवेकर नागपूर, प्रोत्साहन विनया जोशी नागपूर. समूह नृत्य स्पर्धा : प्रथम ब्लॉसम ग्रुप नागपूर, द्वितीय आदिशक्ति ग्रुप नागपुर, तृतीय कोराडी आणि मोहपा ग्रुप विशेष ठरला.कार्यक्रमाचे वैशिष्ट्यलोकमत सखी मंचच्या विभाग प्रतिनिधींनी भोजवानी फूडवर आधारित भव्य नाटिका सादर केली.सखींनी एकल नृत्य, एक अंकी अभिनय, रांगोळी, गीतगायन, काव्यपाठ व समूह नृत्य स्पर्धेत भाग घेतला. जिल्हाभरातून आलेल्या महिलांचा नागपुरातील असा पहिलाच कार्यक्रम ठरला.
जिल्ह्यातील कला-संस्कृतीचे एका मंचावर दर्शन
By admin | Published: May 02, 2017 2:07 AM