नागपूर - शहरातील कुख्यात गुंड सय्यद शकील अली मोहम्मद अली (वय २६, रा. बजेरिया) आणि त्याचा साथीदार रिझवान हसन अन्सारी (वय २२, रा. लोधीपुरा शाळेमागे) या दोघांना तहसील पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली.
हवालदार समीर शेख आणि त्यांचे सहकारी रविवारी पहाटे तहसीलच्या धोंडबा चौक परिसरात गस्त करीत असताना आरोपी शकील तसेच रिझवान त्यांना संशयास्पद अवस्थेत दिसले. पोलिसांची नजर पडताच ते गल्लीबोळातून पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. आरोपींकडे एक तलवार आणि एक चायना मेड चाकू सापडला. या दोघांना अटक करण्यात आली.
आरोपी शकील हा कुख्यात गुंड असून, त्याला गणेशपेठ पोलिसांच्या अहवालानुसार दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले होते. मात्र, तो नागपुरातच राहत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले.