शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

विस्तार करा, युवकांना रोजगार द्या : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 8:54 PM

मॅग्निज ओअर ऑफ इंडिया लि.ने (मॉयल) नफा कमवून सरकारला न देताना प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठीच उपयोगात आणावा. मॉयलने विस्ताराचे विविध प्रकल्प हाती घ्यावेत आणि स्थानिक युवकांना रोजगार द्यावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्देमॉयलच्या चार प्रकल्पाचे ई-भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मॅग्निज ओअर ऑफ इंडिया लि.ने (मॉयल) नफा कमवून सरकारला न देताना प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठीच उपयोगात आणावा. मॉयलने विस्ताराचे विविध प्रकल्प हाती घ्यावेत आणि स्थानिक युवकांना रोजगार द्यावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्रीनितीन गडकरी यांनी केले.मॉयलच्या चार विस्तारित प्रकपाचे ई-भूमिपूजन खापा येथे गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. मंचावर खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, मॉयलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकुंद चौधरी, उत्पादन संचालक दीपांकर सोम, वित्त संचालक राकेश तुमाने, मानव संशाधन संचालक उषा सिंग, मुख्य दक्षता अधिकारी शरदचंद्र तिवारी उपस्थित होते. मॉयलच्या परसोडी मॅग्निज ओअर माईन, मनसर माईन येथे देव स्कूल, हायस्पीड शॉफ्ट गुमगांव माईन, गुमगाव फेरो अलॉईज प्रकल्प या चार प्रकल्पाचे भूमिपूजन गडकरी यांनी बटन दाबून केले.विस्तारित प्रकल्प सार्थकी ठरणारगडकरी म्हणाले, विस्तारित फेरो अलॉय प्रकल्प गुमगांव येथे सुरू करून आश्वासनाची पूर्तता केली आहे. २००२ पासून सुरू असलेल्या प्रकल्पाची क्षमता आता ९० हजार मेट्रिक टनवरून अडीच लाख मेट्रिक टनावर जाणार आहे. या प्रकल्पात ४०० युवकांना रोजगार मिळेल आणि व्यवसाय वाढेल, ही आनंदाची गोष्ट आहे. प्रकल्पात खापा येथील युवकांना घ्या, सावनेरचा विचार नंतर करा. या भागातील हातमाग उद्योग मोडकळीस आल्यामुळे रोजगार हिरावला आहे. या प्रकल्पामुळे मॅग्निजपासून जोडधंदे सुरू होतील. छोट्याछोट्या उद्योगांमुळे युवकांना काम मिळाल्यास हा विस्तारित प्रकल्प सार्थकी ठरेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.खापाच्या ऋणातून मुक्त झालोमॉयलने मिहानप्रमाणेच येथील युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचे आवाहन गडकरी यांनी चौधरी यांना केले. वेस्टर्न कोलफिड आता खाणीतून ८०० ते १००० कोटी रुपयांची रेती विकणार आहे. मॉयलने खाणीतून रेती काढून विक्री करावी. ग्रीन हायवे करण्यासाठी पुढाकार घ्यावा, सावनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वृक्षारोपण करावे, रेमंड कंपनी खापा येथे शाळा सुरू करण्यास इच्छुक आहे, त्यामुळे मॉयलने मनसरप्रमाणेच खापा येथे चांगली शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्याचा फायदा या परिसरातील विद्यार्थ्यांना होईल. मॉयलच्या विस्तारित प्रकल्पासाठी पुढाकार घेतल्यामुळे आता खापाच्या ऋणातून मुक्त झाल्याचे गडकरी म्हणाले. मुकुंद चौधरी म्हणाले, ओपन कास्ट परसोडा मॅग्निज खाण ५३.७५ हेक्टरवर असून वार्षिक उत्पादन ४० हजार टीपीए असे राहील. या प्रकल्पात १९.५४ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून २०० युवकांना रोजगार मिळेल. खाण २०१९-२० मध्ये सुरू होणार आहे. सामाजिक उपक्रमांतर्गत मनसर खाण येथे १० कोटींच्या गुंतवणुकीतून डीएव्ही शाळा बांधण्यात येणार आहे. शैक्षणिक सत्र २०२१-२२ पासून सुरू होईल. गुमगांव माईन येथे हाय स्पीड शॉफ्ट प्रकल्पात १९४.९१ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. प्रकल्पाची सुरुवात २०१९ ला होऊन २०२१ ला पूर्ण होईल. उत्पादन २०२२ पासून सुरू होणार आहे. वार्षिक क्षमता २.५ लाख टन मॅग्निज ओअरची आहे. या प्रकल्पात ४०० युवकांना रोजगार मिळेल. तसेच १५५ कोटींच्या गुंतवणुकीतून उभारण्यात येणाऱ्या गुमगांव फेरो अलॉय प्रकल्पात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ३०० जणांना रोजगार मिळणार आहे. प्रकल्प डिसेंबर २०२१ पासून सुरू होणार आहे. उत्पादन क्षमता २५ हजार टीपीए सिलिको मॅग्निज एवढी आहे. 

‘बावनकुळे रस्ता’ असे नाव!सावनेर ते भंडारापर्यंत रस्ता बांधण्याची चंद्रशेखर बावनमुळे यांची मागणी पूर्ण केली आहे. या रस्त्यामुळे युवकांना व्यवसायासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे नाव आता ‘बावनकुळे रस्ता’ असे असल्याचे आपण गमतीने म्हणत असल्याचे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीministerमंत्री