नागपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि वाढलेली वेटींग लिस्ट पाहून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतून नागपूरमार्गे जाणाऱ्या १४ रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची सुविधा झाली असून त्यांना कन्फर्म बर्थ मिळण्यात अडचण येणार नाही.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२८८७ विशाखापट्टनम-हजरत निजामुद्दीन ही गाडी १ जुलै २०२१ पासून तसेच रेल्वेगाडी क्रमांक ०२८८८ हजरत निजामुद्दीन-विशाखापट्टनम ही गाडी ३ जुलैपासून पुढील सूचनेपर्यंत धावणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२८५७ विशाखापट्टनम-लोकमान्य टिळक टर्मिनस ४ जुलैपासून, रेल्वेगाडी क्रमांक ०२८५८ लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टनम ६ जुलैपासून, रेल्वेगाडी क्रमांक ०२८६६ पुरी-एलटीसी ६ जुलैपासून तसेच रेल्वेगाडी क्रमांक ०२८६५ एलटीटी-पुरी ८ जुलैपासून पुढील सूचनेपर्यंत धावणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२८८० भुवनेश्वर-एलटीटी १ जुलैपासून तसेच रेल्वेगाडी क्रमांक ०२८७९ एलटीटी-भुवनेश्वर ३ जुलैपासून पुढील सूचनेपर्यंत तसेच रेल्वेगाडी क्रमांक ०२८२७ पुरी-सुरत ४ जुलैपासून आणि रेल्वेगाडी क्रमांक ०२८२८ सुरत-पुरी विशेष रेल्वेगाडी ६ जुलैपासून पुढील सूचनेपर्यंत धावणार आहे. याशिवाय रेल्वेगाडी क्रमांक ०२९०५ ओखा-हावडा २७ जूनपासून, रेल्वेगाडी क्रमांक ०२९०६ हावडा-ओखा २९ जूनपासून आणि रेल्वेगाडी क्रमांक ०९२०५ ३० जूनपासून तसेच रेल्वेगाडी क्रमांक ०९२०६ हावडा-पोरबंदर २ जुलैपासून पुढील सुचनेपर्यंत चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व गाड्यात केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी देण्यात येणार असून सर्वांना कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
................