नागपूर : सणासुदीच्या काळात रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणाऱ्या फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, रेल्वेगाडी क्रमांक ०२५९१ बरौनी-एर्नाकुलम साप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल विशेष गाडी ६ ते २७ जानेवारीपर्यंत आठवड्यातून एक दिवस प्रत्येक बुधवारी धावणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२५२२ एर्नाकुलम-बरौनी साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल १० ते ३१ जानेवारीदरम्यान आठवड्यातून एकदा प्रत्येक रविवारी सुटेल. या दोन्ही गाड्यात एकूण २४ कोच राहतील. यात २ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, १३ स्लिपर, ३ साधारण द्वितीयश्रेणी, २ एसएलआर आणि १ डब्ल्यूसीबी कोचचा समावेश आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२५७७ दरभंगा-म्हैसूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी ५ ते २६ जानेवारीदरम्यान आठवड्यातून एकदा प्रत्येक मंगळवारी सुटेल. तसेच रेल्वेगाडी क्रमांक ०२५७८ म्हैसूर-दरभंगा सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी ८ ते २९ जानेवारीदरम्यान आठवड्यातून एकदा प्रत्येक शुक्रवारी धावणार आहे. दोन्ही गाड्यात एकूण २१ कोच राहतील. यात ३ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ३ तृतीय श्रेणी वातानुकूलित, १० स्लिपर, २ साधारण द्वितीय, २ ब्रेक कम जनरेटर कार आणि एका पेंट्रीकारचा समावेश आहे.