नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून सणानिमित्त सुरु केलेल्या विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची सुविधा झाली असून दिवाळीनंतर आपल्या घरी पोहोचणाऱ्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत आहे
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२८१२ हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाडी ४ ते २५ डिसेंबर २०२० दरम्यान प्रत्येक शुक्रवारी धावणार आहे. तर रेल्वेगाडी क्रमांक ०२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया सुपरफास्ट रेल्वेगाडी ६ ते २७ डिसेंबर २०२० दरम्यान आठवड्यातून एकदा प्रत्येक रविवारी सुटणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२८१७ संतराकाची-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी ५ ते २६ डिसेंबर दरम्यान आठवड्यातून एकदा प्रत्येक शनिवारी तसेच रेल्वेगाडी क्रमांक ०२८१८ पुणे-संतराकाची सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी ७ ते २८ डिसेंबर दरम्यान प्रत्येक सोमवारी धावणार आहे. दोन्ही गाड्यात आरक्षित कोच राहणार असून या गाड्यात केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकणार आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. या गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर उपलब्ध आहे.