शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

'भाजप'च्या मदतीची आस ठेवूनच खा. कृपाल तुमानेंची शिंदे गटाला साथ

By कमलेश वानखेडे | Published: July 20, 2022 11:09 AM

शिवसेनेच्या भरवशावर रामटेकचा गड राखणे कठीण, भाजपचे ग्रामीणमध्ये प्राबल्य

कमलेश वानखेडे

नागपूर : दहा दिवसांपूर्वीच आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत, असे सांगणारे रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. तुमाने हे गेल्या दोन टर्मपासून रामटेकच्या गडावर शिवसेनेचा भगवा फडकवीत आहेत. मात्र, असे असले तरी भाजपच्या मदतीशिवाय रामटेकचा गड सर करणे सोपे नाही. शिंदे गटात सहभागी झालो तरच भाजपची साथ मिळेल व पुढील मार्ग सुकर होईल, ही दूरदृष्टी ठेवूनच तुमाने यांनी तसा निर्णय घेतला असावा, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

रामटेक लोकसभेसाठी शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असतो. पण खरी निवडणूक लढते ती भाजपच. ही वास्तविकता आहे. भाजपचे जिल्हाभरात प्रतयेक गावागावात तगडे नेटवर्क आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना युती तुटली. त्यावेळी दोन्ही पक्षांची जिल्ह्यात खरी ताकद किती याचा अंदाज आला. त्यावेळी भाजपच्या उमेदवारांना मिळालेली एकूण मते ही शिवसेनेच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या तिप्पट होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा थेट शिवसेनेवर दावा?; निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र

नागपूर ग्रामीणमध्ये भाजप सावनेर वगळता उर्वरित पाच मतदारसंघांत लढली होती. भाजपला एकूण ४ लाख ३२ हजार ९८० मते मिळाली, तर शिवसेनेला १ लाख ६३ हजार मते मिळाली. यातही सावनेर विधानसभेत भाजप रिंगणात नसल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपने मदत केली होती.

हिंगणा व उमरेड मतदारसंघांत शिवसेना १० हजारांच्या आत, तर काटोल व कामठी मतदारसंघात १५ हजारांच्या आतच निपटली होती.

भाजपची साडेचार लाखांवर व्होट बँक

  • रामटेक लोकसभेत भाजपची स्वत:ची सुमारे साडेचार लाखांवर व्होट बँक आहे. ही मते काही केल्या इकडची तिकडे होत नाहीत.
  • जिल्ह्यातील ८ नगर परिषदेत भाजपचा तर फक्त कन्हान या एकमेव नगर परिषदेत शिवसेनेचा नगराध्यक्ष आहे.
  • जिल्हा परिषदेत भाजपचे १४ सदस्य असून शिवसेनेचा एकमेव सदस्य आहे.
  • नगर पंचायत व जिल्हा परिषदेतील मतदानाची गोळाबेरीज तर ती ५ लाखांवर आहे. शिवसेना या मतांच्या सुमारे चार पट मागे आहे. त्यामुळे एवढी मोठी व्होट बँक सोडून केवळ शिवसेनेच्या बाणावर निवडून येणे तुमाने यांना तेवढे सोपे नव्हते.

आ. जयस्वालांमुळे गड आधीच पोखरला

२०१४ मध्ये आ. आशीष जयस्वाल हे भाजपविरोधात शिवसेनेकडून लढले होते. त्यावेळी त्यांना ४७ हजार २६२ मते मिळाली होती. २०१९ मध्ये भाजप-सेना युती झाली व युतीत रामटेकची जागा भाजपला गेली. त्यावेळी जयस्वाल अपक्ष लढले व विजयी झाले. त्यांना ६७ हजार ४१९ मते मिळाली होती. जयस्वाल यांच्या रूपात शिवसैनिक असलेला एकमेव आमदार शिंदे गटात गेल्यामुळे रामटेकचा गड आधीच पोखरला गेला होता. त्यामुळे शिवसेनेची लोकसभेची वाट आणखी कठीण झाली होती. याचाही धसका तुमाने यांनी घेतला असावा.

तुमाने यांना मिळालेली मते

२००९ -२,९४,९१३

२०१४ - ५,१९,८९२

२०१९ - ५,९७,१२६

टॅग्स :PoliticsराजकारणKrupal Tumaneकृपाल तुमानेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना