लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दलित वस्तीसाठी मिळणाºया निधीतून केवळ रस्त्याचीच कामे केली जात होती. त्यामुळे इतर कामांकडे दुर्लक्ष व्हायचे. मात्र यावर्षी दलित वस्ती सुधार कार्यक्रमांतर्गत मिळालेल्या निधीतून विद्युतीकरण, पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दलित वस्तीच्या विकासासाठी जि.प.च्या समाजकल्याण विभागाला ३४.७० कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे समाजकल्याण अधिकारी सुकेशनी तेलगोटे यांनी सांगितले.दलित वस्त्यांच्या कायापालट करण्यासाठी राज्य शासनाने दलित वस्त्यांच्या विकासासाठी दरवर्षी विशेष निधींची तरतूद केली. परंतु या निधीतून सिमेंट रस्त्यांचीच कामे केली जायची. परंतु हा निकष बाजूला सारून यंदा कामे केली जाणार आहे. योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी समाजमंदिर, रस्ते, सार्वजनिक शौचालयाची कामे झाली आहे. २००८ च्या शासन निर्णयानुसार पुन्हा एकदा राज्यभरातील दलित वस्त्यांचे फेरसर्वेक्षण होऊन किमान ५० लोकसंख्येची अट रद्द करण्यात आलेली आहे.तसेच निधीची उपलब्धता दलित वस्तीनिहाय करण्याचे चांगले धोरण ठरविले आहे. दर पाच वर्षांनी दलित वस्ती सुधारणेसाठी अनुदान मिळणार आहे.तथापि नवीन धोरणामध्ये वस्तीमधील मूलभूत सुविधांची कामे प्रथम पूर्ण झाल्यानंतरच शेवटी समाजमंदिर आणि सिमेंट रस्त्यांची कामे हाती घ्यावीत, असे निर्देश आहेत. पाणीपुरवठा, विद्युत खांब लावणे, स्वच्छता व जलनिस्सारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात आलेले आहे.दलित वस्त्यांमध्ये विकास कामे करण्यासाठी ३४ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. दलित वस्त्यांचा विकास कामांसाठी पंचायत समितीमार्फत प्रस्ताव मागविले जातात.जिल्हा परिषदेला जिल्ह्यातील पंचायत समितीकडून जवळपास २८० प्रस्ताव प्राप्त झाले आहे.या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत २७ आॅक्टोबरला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे. प्रस्तावातील मागणीनुसार विकास कामे केली जाणार आहे. यावर्षीच्या मंजूर निधीतून मागील वर्षी जिथे कामे झाली नाहीत, त्यासाठी विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल, असे तेलगोटे म्हणाल्या.
दलित वस्तीचा निधी विद्युतीकरणावर होणार खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 1:31 AM
दलित वस्तीसाठी मिळणाºया निधीतून केवळ रस्त्याचीच कामे केली जात होती. त्यामुळे इतर कामांकडे दुर्लक्ष व्हायचे.
ठळक मुद्दे३४.७० कोटींचा निधी मंजूर : जिल्हा परिषद