लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भविष्यात निर्माण होणारी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने मे महिन्यात नागपूरनजीकच्या काटोल मार्गावरील येरला येथील राधास्वामी सत्संग संस्थेच्या जागेवर पाच हजार खाटांच्या क्षमतेचे सर्व सोयींनी सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारले होते. इतक्या मोठ्या क्षमतेचे व एवढ्या कमी कालावधीत तयार होणारे हे राज्यातील पहिले ‘कोविड केअर सेंटर' असल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र या सेंटरमध्ये रुग्णांना उपचारासाठी ठेवणे सोयीचे नसल्याने यावर करण्यात आलेला तब्बल ६० लाखांचा खर्च पाण्यात गेला आहे.नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने या सेंटरची संकल्पना मांडली होती. राधास्वामी सत्संग संस्थेने त्यासाठी जागा व सोयी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. मात्र रुग्णांसाठी बेड, डस्टबिन, बकेट, ब्लॅकेट, गाद्या, उपचाराची सुविधा मनपाने उपलब्ध करावयाची होती. यावर मनपाने सुमारे ६० लाख खर्च केले. यातून ५०० बेड तयार करण्यात आले होते. मात्र पावसाळ्याच्या दिवसात येथे रुग्णांना ठेवणे योग्य नाही. जारोचा पाऊस आल्यास पाणी गळते. सामूहिक शौचालय लांब अंतरावर आहे. तसेच आवश्यक असलेले डॉक्टर, वैद्यकीय चमू आणि इतर कर्मचाऱ्यांची व्यवस्था उपलब्ध करणे अवघड आहे.व्यवस्थेबाबतचा दावा चुकीचाकोविड केअर सेंटरमध्ये ५०० खाटांची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक १०० खाटांच्या मागे २० डॉक्टर, वैद्यकीय चमू आणि इतर कर्मचाऱ्यांची चमू काम करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात मनपाने सुसज्ज केलेल्या पाच रुग्णालयात डॉक्टर व पारिचारिका व कर्मचारी नसल्याने कोविड रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले नाही. प्रशासनाने केलेला दावा चुकीचा होता.नागपूर पासून २० कि.मी.दूरयेरला येथील राधास्वामी सत्संग संस्थेचा आश्रम नागपूर शहरापासून २० कि.मी. अंतरावर आहे. अशा ठिकाणी रुग्णांना ठेवणे, त्यांची ने-आण करणे गैरसोयीचे आहे. यामुळे सुरुवातीपासून या सेंटरला पदाधिकाऱ्यांचा विरोध होता.मनपाचा खर्च वाया गेलानागपूर शहरात कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मनपा प्रशासनाने राधास्वामी संत्संग आश्रमात ५ हजार बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात या सेंटरची पाहणी केली असता येथे सुविधा नाहीत. बेड पाण्याने ओले झाले. योग्य नियोजन न केल्याने यावरील सुमारे ६० लाखांचा खर्च वाया गेला. यातून मनपा रुग्णालयात चांगल्या सुविधा निर्माण झाल्या असत्या.पिंटू झलके, अध्यक्ष स्थायी समिती मनपा.
५ हजार बेडच्या कोविड केअर सेंटरचा प्रयोग फसला : ६० लाखांचा खर्च पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 8:16 PM
राज्यातील पहिले ‘कोविड केअर सेंटर' असल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र या सेंटरमध्ये रुग्णांना उपचारासाठी ठेवणे सोयीचे नसल्याने यावर करण्यात आलेला तब्बल ६० लाखांचा खर्च पाण्यात गेला आहे.
ठळक मुद्देफक्त गाद्या अन पलंग, उपचाराची सुविधाच नाही