लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणमध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण करून प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला असून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या या प्रयोगामुळे विदर्भातील वीज वितरण यंत्रणेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.वीज वितरण क्षेत्रात आशिया खंडातील सर्वात मोठी कंपनी म्हणून लौकिक असलेल्या महावितरणच्या कामकाजात अधिक गतिमानता आणि पारदर्शकता आणावयासोबतच अधिकारांचे विकेंद्र्रीकरणाच्या दृष्टिकोनातून कंपनीची प्रादेशिक विभागवार रचना करण्याबाबतची संकल्पना राज्याचे ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे आली. यातून २ आॅक्टोबर २०१६ पासून कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार प्रादेशिक विभागांची स्थापना करण्यात आली. आज दीड वर्षाच्या कार्यकाळात महावितरणच्या या प्रादेशिक कार्यालयांनी महावितरणच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल घडवित, ग्राहकसेवेप्रतिची भूमिका योग्यपणे वठविली आहे. वीज ग्राहकांना खात्रीपूर्वक दर्जेदार सेवा, वीज हानी कमी करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष आणि वीज बिलांची नियमित वसुली या उद्देशाने स्थापित या चार प्रादेशिक कार्यालयांपैकी नागपूर कार्यालयाने प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याची भूमिका सार्थकी ठरविली आहे. प्रादेशिक संचालक, नागपूर यांच्या कार्यक्षेत्रात अकोला, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या परिमंडळांचा समावेश असून अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्र्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या विदर्भातील ११ही जिल्ह्यांचा यात समावेश आहे.नागपूर परिक्षेत्रात केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक ऊर्जा विकास योजना आणि दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजने अंतर्गत २०१७-१८ मध्ये विदर्भात १४७० कोटींहून अधिकची विकास कामे हाती घेण्यात आली असून यात प्रामुख्याने ११५ नवीन वीज उपकेद्र्रांचा समावेश आहे, त्यापैकी अमरावती मंडळातील पाच आणि यवतमाळ दोन, अकोला दोन, नागपूर ग्रामीण पाच तर गोंदिया आणि चंद्र्रपूर मंडलातील प्रत्येकी एक अशी एकूण १६ उपकेंद्रे्र कार्यान्वित झाली आहेत. तर ९२ उपकेंद्र्रांचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय ३२ उपकेंद्र्रातील रोहित्रांच्या क्षतमावाढीच्या कामांपैकी १६ उपकेंद्रातील रोहित्रांच्या क्षमतावाढीची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.उपकेंद्र्र रोहित्रांच्या सोबतीला अतिरिक्त रोहित्र बसविण्याच्या मंजूर २६ कामांपैकी १८ अतिरिक्त रोहित्र उभारणीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे पूर्णत्वाकडे आहे, याचसोबत १२४०.५ किमी लांबीच्या उच्चदाब वीज वाहिनीची कामे पूर्ण झाली तर ४०९ नवीन वितरण रोहित्रे लावण्यात आली आहेत. वाशिम जिल्ह्यात दोन ठिकाणी कॅपेसिटर बँक उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय लघुदाब वीज वाहिन्या उभारणीसोबतच ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील २१४० लाभार्थ्यांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रादेशिक संचालक भालचंद्र्र खंडाईत यांनी दिली.