सदरच्या किडी व रोगाच्या प्रादुर्भावग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे डॉ.सुधीर बोरकर, डॉ.नंदकिशोर लव्हे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे, मंडळ कृषी अधिकारी रामू धनविजय, कृषी सहायक निरंजन गहूकर यांनी गुमगाव येथील शेतकरी रवींद्र मुटे यांच्या शेतातील सोयाबीन, सालईदाभा येथील सुरेश नरड, तसेच किन्ही भांसोली येथील शेतकरी गजानन नरताम यांचे शेतातील कापूस पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले. या प्रसंगी रवींद्र साळवटकर, भाऊराव गांजडे, प्रकाश लेंडे, प्रशांत शेटे, लक्ष्मण पाटील, श्रावण उपासे यांचेसह गुमगाव, शिवमडका, किरमिटी, लाडगाव या शिवारातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिकांवरील किडींची तज्ज्ञाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:13 AM