शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

रेल्वे अधिका-याचा प्रताप , शरीरसंबंध प्रस्थापित करून लग्नास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 5:02 PM

भावी पत्नीसोबत वारंवार शरिरसंबंध प्रस्थापीत केल्यानंतर आता लग्नास नकार देणारा रेल्वेतील अधिकारी आशिष हरिभाऊ मेश्राम (वय २६) आणि त्याच्या आई विरुद्ध जरीपटका पोलिसांनी बलात्कार तसेच फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देजरीपटका पोलीस ठाण्यात बलात्कार व फसवणूकीचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भावी पत्नीसोबत वारंवार शरिरसंबंध प्रस्थापीत केल्यानंतर आता लग्नास नकार देणारा रेल्वेतील अधिकारी आशिष हरिभाऊ मेश्राम (वय २६) आणि त्याच्या आई विरुद्ध जरीपटका पोलिसांनी बलात्कार तसेच फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.जरीपटक्यातील २५ वर्षीय तक्रारदार तरुणी बारावी पास असून, ती खासगी नोकरी करते. वस्तीतीलच आरोपी आशिष मेश्रामसोबत तिचा १६ एप्रिल २०१७ ला साक्षगंध झाला होता. आरोपी मेश्राम रेल्वेत नोकरी करतो. सध्या त्याची नियुक्ती स्टेशन मास्तर म्हणून बडोदरा गुजरात येथे आहे. साक्षगंधात तरुणीच्या आईवडीलांनी त्याला सोन्याची अंगठी दिली होती. २५ डिसेंबर २०१७ ला या दोघांचे लग्न ठरले होते. दरम्यान, साक्षगंध झाल्यानंतर तो सुटीवर जेव्हा केव्हा नागपुरात यायचा. तेव्हा तो तरुणीसोबत शरिरसंबंध जोडायचा. लग्न होणार असल्यामुळे तरुणी त्याला विरोध करीत नव्हती. दरम्यान, तरुणीच्या परिवाराकडून लग्नाची पूर्ण तयारी करण्यात आली असता आरोपीने लग्नाची तारिख पुढे ढकलली. त्यानंतर त्याला लग्नासाठी विचारणा करताच तो वेगवेगळे कारण सांगून टाळाटाळ करू लागला. ५ मे रोजी अचानक त्याने तरुणीला फोन केला. ‘आम्ही हे लग्न करू शकत नाही. तुम्हाला लग्न करायचे असेल तर लग्नाचा संपूर्ण खर्च ५ लाख रुपये रोख स्वरूपात द्यावा लागेल’, असे म्हटले. त्याच्या या अनपेक्षीत पवित्र्यामुळे तरुणीने त्याला ठोस कारण विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तिने आपल्या पालकांना सांगितले. पालकांनी नातेवाईक तसेच मध्यस्थांना घेऊन आरोपी आशिष मेश्राम तसेच त्याची आई रत्नमाला हरीभाऊ मेश्राम यांची भेट घेतली. मेश्राम मायलेकांनी लग्न करायचे नाही, असे सांगून असंबंद्ध उत्तरे दिली. अनेकांनी समजूत काढूनही ते ऐकायला तयार नव्हते.मुलाला अटक, आईची चौकशीअखेर बुधवारी सायंकाळी तरुणीने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्कार तसेच फसवणूकीच्या आरोपाखाली आशिष आणि त्याची आई रत्नमाला या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आशिषला गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली. त्याच्या आईची वृत्तलिहिस्तोवर चौकशी सुरू होती.

टॅग्स :Rapeबलात्कारArrestअटक