शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

उड्डाणपुलावर स्फोटकांचा ट्रक आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - स्फोटकांनी भरलेला ट्रक उड्डाणपुलावर सोडून पळ काढत ट्रकचालकाने उपराजधानीत प्रचंड खळबळ उडवून दिली. माहिती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - स्फोटकांनी भरलेला ट्रक उड्डाणपुलावर सोडून पळ काढत ट्रकचालकाने उपराजधानीत प्रचंड खळबळ उडवून दिली. माहिती कळताच पोलीस आणि विविध तपास यंत्रणांसह एटीएसचे पथकही घटनास्थळी पोहचले. हा ट्रक तेथून सुखरूप बाहेर हलविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत तपास यंत्रणा करीत होत्या.

एक ट्रक बराच वेळेपासून नागपूर-वर्धा मार्गावरच्या उड्डाणपुलावर उभा असल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास प्रतापनगर पोलिसांना मिळाली. ठाणेदार दिनकर ठोसरे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे धावले. ट्रक बंद होता अन् चालक गायब होता. त्यांनी बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर ट्रकमधील कागदपत्रे तपासली. त्यात ट्रकमालकाचा क्रमांक होता. त्यावर संपर्क केला असता या ट्रकमध्ये स्फोटके असल्याची माहिती त्यांना मिळाली. अर्थातच स्फोटकांनी भरलेला ट्रक छत्रपती चाैकाजवळ (उड्डाणपुलावर) सोडून ट्रकचालक निघून गेल्याचे लक्षात आल्याने पोलिसांची धडधड वाढली. ट्रकमालकाने दिलेल्या मोबाईलवर पोलिसांनी संपर्क केला. ट्रकचालकाने डिझेल संपल्याने ट्रक तेथे सोडल्याचे सांगून परत येतो, असे म्हटले. मात्र, नंतर बरेचदा संपर्क करूनही ट्रकचालकाने प्रतिसाद दिला नाही. नंतर त्याने त्याचा मोबाईलच बंद करून टाकला. त्यामुळे पोलीस हबकले. त्यांनी वरिष्ठांसह दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) कळविले. त्यानंतर एटीएस, बॉम्बशोधक आणि नाशक पथक तसेच अन्य तपास यंत्रणाही धडकल्या. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. शहरात घबराट पसरू नये म्हणून पोलिसांनी याबाबत वाच्यता करण्याचे टाळले. स्फोटकांनी भरलेला ट्रक तेथून सुखरूपस्थळी हलविण्यासाठी पोलीस, बीडीडीएस आणि एटीएस प्रयत्न करीत होते.

----

हैदराबादहून आली स्फोटके

सूत्रांच्या माहितीनुसार, स्फोटकांनी भरून असलेला हा ट्रक हैदराबादहून नागपुरात आल्याचे समजते. तो कुणाकडे जाणार होता, ते मात्र वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही.

----