शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

नागपूरात उड्डाणपुलावर आढळला स्फोटकांचा ट्रक; तपासाअंती पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्‍वास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 11:52 PM

पोलिसांसह एटीएसही धावली, एक ट्रक बराच वेळेपासून नागपूर-वर्धा मार्गावरच्या उड्डाणपुलावर उभा असल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास प्रतापनगर पोलिसांना मिळाली.

ठळक मुद्दे ट्रक बंद होता अन् चालक नदारद होता. त्यांनी बराच वेळ प्रतिक्षा केल्यानंतर ट्रकमधील कागदपत्रे तपासली. स्फोटकांनी भरलेला ट्रक छत्रपती चाैकाजवळ (उड्डाणपुलावर) सोडून ट्रकचालक निघून गेल्याचे लक्षात आल्याने पोलिसांची धडधड वाढलीस्फोटकांनी भरून असलेला हा ट्रक हैदराबादहून नागपुरात आल्याचे समजते

 

नागपूर - स्फोटकांनी भरलेला ट्रक उड्डाणपुलावर सोडून पळ काढत ट्रकचालकाने उपराजधानीत प्रचंड खळबळ उडवून दिली. माहिती कळताच पोलीस आणि विविध तपास यंत्रणांसह एटीएसचे पथकही घटनास्थळी पोहचले. हा ट्रक तेथून सुखरूप बाहेर हलविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत तपास यंत्रणा करीत होत्या.

एक ट्रक बराच वेळेपासून नागपूर-वर्धा मार्गावरच्या उड्डाणपुलावर उभा असल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास प्रतापनगर पोलिसांना मिळाली. ठाणेदार दिनकर ठोसरे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे धावले. ट्रक बंद होता अन् चालक नदारद होता. त्यांनी बराच वेळ प्रतिक्षा केल्यानंतर ट्रकमधील कागदपत्रे तपासली. त्यात ट्रकमालकाचा क्रमांक होता. त्यावर संपर्क केला असता या ट्रकमध्ये स्फोटके भरून असल्याची माहिती त्यांना मिळाली. अर्थातच स्फोटकांनी भरलेला ट्रक छत्रपती चाैकाजवळ (उड्डाणपुलावर) सोडून ट्रकचालक निघून गेल्याचे लक्षात आल्याने पोलिसांची धडधड वाढली. ट्रकमालकाने दिलेल्या मोबाईलवर पोलिसांनी संपर्क केला. ट्रकचालकाने डिझेल संपल्याने ट्रक तेथे सोडल्याचे सांगून परत येतो, असे म्हटले. मात्र, नंतर बरेचदा संपर्क करूनही ट्रकचालकाने प्रतिसाद दिला नाही. नंतर त्याने त्याचा मोबाईलच बंद करून टाकला. त्यामुळे पोलीस हबकले. त्यांनी वरिष्ठांसह दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) कळविले. त्यानंतर एटीएस, बॉम्बशोधक आणि नाशक पथक तसेच अन्य तपास यंत्रणाही धडकल्या. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. शहरात घबराट पसरू नये म्हणून पोलिसांनी याबाबत वाच्यता करण्याचे टाळले. स्फोटकांनी भरलेला ट्रक तेथून सुखरूपस्थळी हलविण्यासाठी पोलीस, बीडीडीएस आणि एटीएस प्रयत्न करीत होते.

हैदराबादहून आली स्फोटकेसूत्रांच्या माहितीनुसार, स्फोटकांनी भरून असलेला हा ट्रक हैदराबादहून नागपुरात आल्याचे समजते. तो कुणाकडे जाणार होता, ते मात्र वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस