आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपुरी संत्र्याची जगात ओळख आहे. टेबल फ्रूट म्हणून सर्वत्र मागणी आहे. संत्र्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून शेतकऱ्यांतर्फे प्रचंड मेहनत घेतली जाते. पण एखाद्या वेळी नैसर्गिक आपत्तीने संत्री खराब झाल्यास उत्पादक आर्थिक संकटात येतो. तोडणीपश्चात संत्र्यावर करण्यात येणाऱ्या आधुनिक प्रक्रियेच्या सोयीसुविधा इस्रायल येथील शेतकऱ्यांप्रमाणे प्रत्येकाच्या शेतात असाव्यात, अशी मागणी पुढे आली आहे. संत्र्याला जागतिक ब्रॅण्ड म्हणून पुढे आणायचे असल्यास शेतकऱ्यांना शासनाने आधुनिक सोयीसुविधा पुरविण्याची गरज आहे. शासन, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी एकत्रितरीत्या काम करून उत्पादन आणि निर्यात वाढविण्याची गरज असल्याचे मत कृषी विशेषज्ञांनी व्यक्त केले.रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या तीन दिवसीय वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी तांत्रिक सत्रात राज्य आणि केंद्रामध्ये कार्यरत वरिष्ठ कृषी विशेषज्ञ, वैज्ञानिक आणि उत्पादकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.संत्रा पीक वाढविण्याचे प्रयत्नमिझोरममध्ये संत्र्यांचे उत्पादन वाढविणे, हे जिकिरीचे काम आहे. त्यासाठी राज्य सरकार संशोधन आणि विकासावर विशेष प्रयत्न घेते. संत्र्याच्या मशागतीसाठी अनेक अडचणी आहेत. डोंगराळ प्रदेशात उतरत्या जागेवर संत्र्यांचे पीक घेतले जाते. सध्या राज्यात १६,०३० हेक्टरवर संत्र्याची लागवड आहे. पण अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट होते. माती आम्लीय, झिंकची कमतरता असून कीटकांवर काहीही नियंत्रण नाही. एमआयडीएचतर्फे बागायतदारांना व्यवस्थापनावर प्रशिक्षण देण्यात येते.पी.सी. लालनघाहसंगीवैज्ञानिक, हॉर्टिकल्चर विभाग, मिझोरम.आॅनलाईनने शेतकी उत्पादने विका‘राष्ट्रीय कृषी बाजार’ (एनएएम) हे शेतकऱ्यांना शेतकी उत्पादने विकण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ई-नाम हे इलेक्ट्रॉनिक्स पोर्टल असून, त्यामुळे राज्य आणि केंद्रामध्ये पारदर्शकता आली आहे. या पोर्टलचे उद्घाटन १४ एप्रिल २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावर १४ राज्यांमधील ४७० बाजारपेठांना जोडले आहे. २०१८ पर्यंत एकूण ५८५ बाजारपेठा जोडण्यात येणार आहेत. ९० कृषिमालाची नोंदणी असून त्यात संत्र्याचा समावेश आहे. अॅप मोबाईलवर डाऊनलोड करता येतो.गुंजन शिवहरेअधिकारी, ‘ई-नाम’.