चित्रपटाचा प्रवास नागपूर ते आॅस्करचित्रपटाचा प्रवास नागपूर ते आॅस्करनागपूरच्या या चळवळ्या व्यक्तिमत्त्वाने कोर्ट या चित्रपटातील नारायण कांबळेची मुख्य भूमिका अशी काही जिवंत केली की राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीयस्तरावरील चित्रपट समीक्षकांनाही याची दखल घेणे भाग पडले. आता तर जगातील सर्वात मोठ्या आॅस्कर पुरस्काराचे नामांकन मिळाल्याने चळवळींमध्ये स्वत:ला वाहून घेतलेल्या वीरा यांच्यातील कलावंताचीही उंची अधिकच वाढली आहे. त्यांच्या रूपाने नागपूरचे नावही सातासमुद्रापार पोहचले आहे.कोर्ट हा मराठी चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाला १८ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. भारतातील सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर वीरा यांचे नाव पहिल्यांदा प्रकाशझोतात आले. आतापर्यंत ६० देशांतील चित्रपट महोत्सवामध्ये हा चित्रपट झळकला असून, विविध देशांतील २७ पुरस्कार या चित्रपटाने पटकाविले आहेत. विशेष म्हणजे कोटींच्याकोटी उड्डाणे घेणाऱ्या बहुचर्चित बजरंगी भाईजान आणि बाहुुबली या चित्रपटांची आॅस्करच्या नामांकनाबाबत चर्चा होती. मात्र या चित्रपटांना पछाडत साडेतीन कोटींमध्ये तयार झालेल्या कोर्टला आॅस्करच्या स्पर्धेत स्थान मिळाले. श्वास या मराठी चित्रपटानंतर आॅस्करमध्ये नामांकन मिळणारा कोर्ट हा दुसरा चित्रपट ठरला आहे. लेखक चैतन्य ताम्हाणे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले तर विवेक गोम्बर हे निर्माता आहेत. आॅस्करमध्ये नामांकनाची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्याने वीरा साथीदार यांच्यावर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वीरा नागपुरातच असल्याने त्यांच्या चाहत्यांनी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी झीरो माईल येथील संघर्ष वाहिनीच्या कार्यालयाकडे धाव घेतली.(प्रतिनिधी)पत्नीकडून मिळाली ही गोड बातमीवीरा यांची पत्नी पुष्पा साथीदार ही बुटीबोरीलगत परसोडी गावात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे. टीव्हीवर बातमी झळकताच सर्वप्रथम तिनेच आपल्याला ही गोड बातमी देऊन अभिनंदन केल्याचे वीरा यांनी सांगितले. ही बातमी मिळाल्याने अतिशय आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. मित्रांसह असंख्य चाहत्यांनीही अभिनंदन केल्याने आनंद होतो आहे, असे ते म्हणाले.
वीरा साथीदार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव : नागपूरकरांनी व्यक्त केला आनंद
By admin | Published: September 24, 2015 3:17 AM