लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही वर्षात देशात वाढलेली असहिष्णूता हे चिंतनाचे व चिंतेचे कारण ठरले आहे. वाढलेली धर्मांधता, जातीय हिंसाचार, गाईच्या नावाने हिंसक होणारा समाज, विरोधकांना लक्ष्य करणे, असे अनेक प्रश्न आणि या सर्वांमध्ये भरडला जाणारा सामान्य नागरिक, असे अस्वस्थ करणारे वास्तव दिसत आहे. साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवरांनी याविरुद्ध आवाज बुलंद केला आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध कलावंतांनी आवाज उठवला की, तो दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न होतो हा जगाचा इतिहास आहे. परंतु लक्ष्य केले जाते म्हणून गप्प राहू नका कारण गप्प राहिले तरी लक्ष्य व्हाल. त्यापेक्षा सामुदायिकपणे या अस्वस्थ वातावरणाविरुद्ध आवाज उठवा, असा संदेश देत सेक्युलर चित्रकला प्रदर्शनाला शुक्रवारी नागपुरात सुरुवात झाली.अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ विचारवंत ताराचंद्र खांडेकर, माजी पोलीस सहा.आयुक्त भरत शेळके, डॉ. अशोक गायकवाड, माजी कला संचालक प्रा. हेमंत नागदिवे, ज्येष्ठ चित्रकार प्रा. प्रमोदबाबू रामटेके, इ.मो. नारनवरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मध्यवर्ती संग्रहालयाच्या (अजब बंगला) कलादालनात या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन
चित्रकारांच्या अभिव्यक्तितून अस्वस्थ भारताचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 11:40 PM
गेल्या काही वर्षात देशात वाढलेली असहिष्णूता हे चिंतनाचे व चिंतेचे कारण ठरले आहे. वाढलेली धर्मांधता, जातीय हिंसाचार, गाईच्या नावाने हिंसक होणारा समाज, विरोधकांना लक्ष्य करणे, असे अनेक प्रश्न आणि या सर्वांमध्ये भरडला जाणारा सामान्य नागरिक, असे अस्वस्थ करणारे वास्तव दिसत आहे. साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवरांनी याविरुद्ध आवाज बुलंद केला आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध कलावंतांनी आवाज उठवला की, तो दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न होतो हा जगाचा इतिहास आहे. परंतु लक्ष्य केले जाते म्हणून गप्प राहू नका कारण गप्प राहिले तरी लक्ष्य व्हाल. त्यापेक्षा सामुदायिकपणे या अस्वस्थ वातावरणाविरुद्ध आवाज उठवा, असा संदेश देत सेक्युलर चित्रकला प्रदर्शनाला शुक्रवारी नागपुरात सुरुवात झाली.
ठळक मुद्दे नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात तीन दिवसीय प्रदर्शन : नामवंत चित्रकारांच्या कलाकृती