शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

देशातील समृद्ध इतिहास लोकांपर्यंत पोहोचवा

By admin | Published: July 24, 2014 1:02 AM

देशातील इतिहास अतिशय समृद्ध आहे. परंतु तो विस्तृतपणे लोकांपर्यंत पोहोचलेलाच नाही. त्यामुळे हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. याची सुरुवात शालेय जीवनापासून व्हावी.

उमेश चौबे : लोकमत समाचारचे राजीव सिंह युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित नागपूर : देशातील इतिहास अतिशय समृद्ध आहे. परंतु तो विस्तृतपणे लोकांपर्यंत पोहोचलेलाच नाही. त्यामुळे हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. याची सुरुवात शालेय जीवनापासून व्हावी. विद्यार्थी दशेपासूनच मुलांना इतिहासाचा परिचय करून देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे यांनी केले. लोकमान्य टिळक आणि शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त लोटस् कल्चरल अ‍ॅण्ड स्पोर्टिंग असोसिएशनतर्फे बुधवारी सायंकाळी गांधीसागरस्थित नागपूर नागरी सहकारी बॅकेच्या सभागृहात आयोजित युवा पत्रकार पुरस्कार प्रदान समारोह आणि शहीद चंद्रशेखर आझार व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर आ.प्रा. अनिल सोले होते. तर आ. मितेश भांगडिया, आ. विकास कुंभारे, मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी, डॉ. लोकेंद्र सिंग, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, पत्रकार आनंद निर्वान, लोटस् कल्चरल अ‍ॅण्ड स्पोर्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष विपुल मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी लोकमत समाचारचे उपसंपादक राजीव सिंह यांच्यासह टाइम्स आॅफ इंडियाचे अंजय्या अनपार्थी आणि लोकशाही वार्ताचे योगेश बरवड यांना युवा पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ११ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी महापौर आ.प्रा. अनिल सोले म्हणाले, लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार मिळाल्यामुळे पुरस्कारप्राप्त पत्रकारांची जबाबदारी आणखी वाढली आहे. आ. भांगडिया यांनी या पुरस्कारामुळे लोकमान्य टिळकांच्या विचारांपासून युवा पत्रकारांना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. अतुल पांडे, डॉ. लोकेंद्र सिंग, आ. विकास कुंभारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दयाशंकर तिवारी यांनी कार्यक्रमामागची भूमिका समजावून सांगितली. गिरधारी मंत्री यांनी प्रास्ताविक केले. क्षमाशंकर तिवारी यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)