लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाची शान असलेल्या महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणने गेल्या वर्षी ३ डिसेंबरला काढून घेतली होती. या आदेशाच्या विरोधात महाराज बाग व्यवस्थानाने प्राधिकरणाकडे अपील केले होते. अखेर के द्रीय प्राधिकरणाने तीन महिन्यानंतर महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता वर्षभरासाठी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.कृषी विद्यापीठाने नियमाचे उल्लंघन केल्याच्या कारणामुळे प्राणिसंग्रहालयाची मान्यता काढण्यात आली होती. या विरोधात कृषी विद्यापीठाने जानेवारी २०१९ मध्ये प्राधिकरणाकडे अपील केले होते. आपली बाजु मांडण्यासाठी प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाला ११ मार्चला दिल्लीला बोलावले होते. संग्रहालयाचा प्रस्तावित विकास आराखडा अनेक वर्षापासून मंजूर न केल्याने येथील विकास कामे रखडल्याचे व्यवस्थापनाने बाजू मांडताना प्राधिकरणाच्या निदर्शनास आणले. १२५ वर्षे जुने महाराज बाग प्राणिसंग्रहालय नागपूरच्या हृदयस्थळी वसलेले आहे. हे विदर्भातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय धोरण-१९९८ अनुसार केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणने देशभरातील प्राणिसंग्रहालयाचा विस्तार व देखभालीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु मंजुरी नसल्याने विकास कामे बाधित झाल्याचे सांगितले. यावर प्राधिकरणाने विकास आराखड्यावर महिनाभरात निर्णय घेण्याची ग्वाही दिली. तसेच वर्षभरासाठी मान्यता वाढविली. वर्षभरानंतर प्राधिकरणाचे शिष्टमंडळ महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील विकास कामांची पाहणी करतील. त्यानंतर पुढील मान्यता कायम ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल.कितीवेळा पाठविला विकास आराखडामहाराज बागेच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय धोरणानुसार विकासासाठी २०११ मध्ये ‘मास्टर प्लान’ तयार करून मंजुरीसाठी दिल्लीला पाठविला होता. प्राधिकरणाने २०११, २०१२ व २०१४ साली सुधारणा व नवीन दिशानिर्देशासह महाराज बाग व्यवस्थापनाला प्रस्ताव परत पाठविला होता. त्यानंतर २०१६ मध्ये सुधारित मास्टर प्लान पाठविण्यात आला. परंतु याला प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे विकास कामे करणे शक्य झाले नाही. अखेर चौथ्यांदा फेब्रुवारी २०१८ मध्ये प्राणिसंग्रहालयाचा विकास आराखडा मंजुरीसाठी पाठविला होता. मे २०१८ मध्ये सुनावणी दरम्यान प्राधिकरणाने मंजुरीचे आश्वासन दिले होते.
महाराज बाग प्राणिसंग्रहालयाला पुन्हा वर्षभराची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:22 AM
विदर्भाची शान असलेल्या महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणने गेल्या वर्षी ३ डिसेंबरला काढून घेतली होती. या आदेशाच्या विरोधात महाराज बाग व्यवस्थानाने प्राधिकरणाकडे अपील केले होते. अखेर के द्रीय प्राधिकरणाने तीन महिन्यानंतर महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता वर्षभरासाठी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देविकास आराखड्याला महिनाभरात मंजुरीची शक्यता : १२५ वर्षापूर्वीच्या महाराज बागेचा विकास होण्याची आशा