लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहांमधील प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा सुरू करण्यात आलेली असून सामाजिक न्याय विभागांतर्गत नागपूर जिल्ह्यात शहरातील मागासवर्गीय मुला-मुलींची एकूण १४ वसतिगृहे तसेच तालुका स्तरावरील मागासवर्गीय मुला-मुलींचे एकूण ११ शासकीय वसतिगृह उमरेड, कुही (मुलांचे), कुही (मुलींचे), वानाडोंगरी (मुलांचे), वानाडोंगरी (मुलींचे), नांदा, ता. कामठी (मुलांचे), पारशिवनी (मुलांचे), काटोल (मुलीचे), रामटेक (मुलींचे), कळमेश्वर (मुलींचे), सावनेर (मुलींचे) अशा एकूण २५ शासकीय वसतिगृहांकरिता सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता शालेय अभ्यासक्रमाच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज मागवण्यात आले आहेत.
यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती,मांग,मेहतर, भंगी, इतर मागासवर्गीय, विशेष मागासप्रवर्गासह इतर प्रवर्गाच्या इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनींंनी प्रवेशाकरिता शहराच्या केंद्रभागी असलेल्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, वसंतनगर, चोखामेळा परिसर, दीक्षाभूमी चौक, नागपूर येथून विनामूल्य अर्ज प्राप्त करून निर्धारित मुदतीत संपूर्ण आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. तसेच वसतिगृह प्रवेश अर्ज क्यूआर कोड वरून देखील उपलब्ध करून घेऊन आवश्यक कागदपत्रांसह वसतिगृहात सादर करू शकता तसेच ग्रामीण भागातील तालुका स्तरावरील एकूण ११ वसतिगृहांत प्रवेशाकरिता संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून अर्ज प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे सादर करावेत, असे समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी कळविले आहे.