शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

कोविड रुग्णांकडून जादा बिल वसुली : रुग्णालये १५२, माहिती दिली फक्त २२ ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 10:27 PM

Extra bill recovered from Covid patients कोविड रुग्णावर उपचार करताना खासगी रुग्णालयांनी मनमानी बिल वसुली केल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मनपा प्रशासनाने २० मे रोजी यासंदर्भात खासगी रुग्णालयांना पत्र पाठवून आरक्षित ८० टक्के बेडवरील भरती रुग्ण, अनारक्षित २० टक्के बेड व विमा असलेल्या रुग्णावर करण्यात आलेले उपचार यासंदर्भात शहरातील १५२ रुग्णालयांना माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु रुग्णालयांनी याला विरोध दर्शविला. प्रकरण न्यायालयात गेले. आतापर्यंत २२ रुग्णालयांनीच माहिती दिल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी शुक्रवारी ऑनलाईन मनपा सभागृहात दिली.

ठळक मुद्देविरोधक मनपाच्या कार्यप्रणालीवर नाराज

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड रुग्णावर उपचार करताना खासगी रुग्णालयांनी मनमानी बिल वसुली केल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मनपा प्रशासनाने २० मे रोजी यासंदर्भात खासगी रुग्णालयांना पत्र पाठवून आरक्षित ८० टक्के बेडवरील भरती रुग्ण, अनारक्षित २० टक्के बेड व विमा असलेल्या रुग्णावर करण्यात आलेले उपचार यासंदर्भात शहरातील १५२ रुग्णालयांना माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु रुग्णालयांनी याला विरोध दर्शविला. प्रकरण न्यायालयात गेले. आतापर्यंत २२ रुग्णालयांनीच माहिती दिल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी शुक्रवारी ऑनलाईन मनपा सभागृहात दिली.

काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी कोविड रुग्णालयाच्या मनमानी कारभाराचा मुद्दा उपस्थित केला. ८० टक्के बेडवर भरती रुग्णांकडून जादा बिल वसूल केल्याच्या तक्रारींची माहिती देण्याची मागणी केली. तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांना मनपाने रामभरोसे सोडल्याचा आरोप केला. प्रवीण दटके यांनीही बिलाचा प्रश्न उपस्थित केला. खासगी रुग्णालयाकडून माहिती देण्याला टाळाटाळ केली जात आहे. परंतु न्यायालयाने रुग्णालयांना माहिती देण्याचे निर्देश दिले आहे. लवकरच माहिती उपलब्ध होईल, अशी माहिती जलज शर्मा यांनी दिली.

संकटकाळात मनपा प्रशासन व कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. यामुळे रुग्णसंख्या कमी झाली. दररोज ४०० मृत्यूचा दावा चुकीचा आहे. एप्रिल महिन्यात ७,५०० मृत्यू झाले. त्यामुळे कोविड मृत्यूचे आकडे अधिक नसल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. दिव्यांगांना स्टॉल देण्याबाबत धोरण ठरविण्याचे निर्देश दिले.

कचरा संकलन, पाच सदस्यीय समिती गठित

कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांच्या मनमानीचा प्रश्न विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत स्थगनच्या माध्यमातून उपस्थित केला. यावर महापौरांनी चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती गठित करण्याची घोषणा केली. कचरा संकलन करणाऱ्या कंपन्या माती मिसळून वजन वाढवीत असल्याचा आरोप वनवे यांनी केला. काही भागात कचरा उचलला जात नसल्याचे निदर्शनास आणले.

स्मार्ट सिटी प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळावा

पूर्व नागपुरातील स्मार्ट सिटी प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात यावा, रस्त्यामुळे अनेकांची घरे तोडली जात आहेत. कमीतकमी घरे जातील असे नियोजन करावे, अशी मागणी नगरसेवक प्रदीप पोहाणे यांनी केली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका