शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

सिकलसेल रुग्णांची फरफट

By admin | Published: February 21, 2017 1:59 AM

एकीकडे मृत्यूचे भय तर दुसरीकडे अवहेलना या कात्रीत सिकलसेल रुग्ण सापडला आहे.

मेडिकलमध्ये चार वर्षांपासून गर्भजल परीक्षण बंद : डागा रुग्णालयात उपकरणाची प्रतीक्षानागपूर : एकीकडे मृत्यूचे भय तर दुसरीकडे अवहेलना या कात्रीत सिकलसेल रुग्ण सापडला आहे. राज्यातील एकमेव मेडिकलमधील मोफत गर्भजल परीक्षण केंद्र चार वर्षांपासून बंद आहे. तर गरोदर मातांच्या गर्भातील बाळाचे परक्षण करण्यासाठी डागा स्मृती स्त्री रुग्णालयाला गर्भजल परीक्षण यंत्रणा केंद्राला अद्यापही उपकरण उपलब्ध झालेले नाही. परिणामी, सिकलसेलशी झुंजणाऱ्या गरोदर मातांची कुचंबणा सुरू आहे.एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारा आजार म्हणून सिकलसेल ओळखला जातो. सिकलसेलचे वाहक असलेल्या जोडप्यांमध्ये विवाह झाला तर जन्माला येणाऱ्या बाळाला सिकलसेल होण्याची जोखीम ९० टक्क्यांनी बळावते. अशा गरोदर मातांच्या गर्भातील बाळाचे परीक्षण करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) विकृतीशास्त्र विभागात सात वर्षांपूर्वी उपकरण घेण्यात आले. या उपकरणावर आठवड्यातून २५-३० रुग्णांचे निदान व्हायचे. याच्या एका ‘किट’ला साधारण ९३ हजार रुपये खर्च यायचा. ‘एनआरएचएम’मधून हा निधी मिळायचा. परंतु उपकरण बंद पडल्याने रुग्णांना पदरमोड करून बाहेरून ही महागडी चाचणी करावी लागायची. गेल्या चार वर्षांपासून हे उपकरण नादुरुस्त अवस्थेत आहे. रुग्णालय प्रशासनाने नव्या उपकरणासाठी आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे.(प्रतिनिधी) डागात खोल्या बांधून तयार डागा स्मृती स्त्री रुग्णालयाला गर्भजल परीक्षण यंत्रणा खरेदी करून देण्यासाठी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सरकारने ही तरतूद करून दिली. त्यासाठी मुंबई येथील आयसीएमआरच्या सहकार्याने हा निधी देण्यात येईल असे सांगण्यात आले. ही यंत्रणा सुरू करण्यासंदर्भात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना डागाला करण्यात आल्या. त्यानुसार डागात गेल्या वर्षभरासून खोल्या बांधून तयार आहेत. मात्र उपकरणे खरेदीचे अधिकार मुंबईला असल्याने तेथून फायलीच पुढे सरकेनाशा झाल्या आहेत. परिणामी, गर्भजल परीक्षण यंत्रणा बारगळल्याने गरोदर माता अडचणीत आल्या आहेत.