शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

फडक्यांच्या यज्ञवेदीवर, तीन नरवीर, बंधू चाफेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 1:12 AM

क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांचा कारागृहात यातना सहन करून मृत्यू झाल्याची बातमी दामोदर, वासुदेव व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी केसरी वर्तमानपत्रात वाचली आणि देशभक्तीचे विचारचक्र त्यांच्या मनात सुरू झाले. ही धग मनात पेटत होती. पुढे इंग्रज अधिकारी रॅँडने पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा अत्याचार चालविले आणि चाफेकर बंधूंचे रक्त खवळले. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून दामोदर व बाळकृष्ण चाफेकर यांनी रॅँडची हत्या केली. हभप योगेश्वर उपासनी महाराज चाफेकर बंधूंची कथा ऐकवित होते आणि उपस्थित प्रेक्षक रोमांचित होऊन हा धगधगता जीवनपट ऐकत होते. निमित्त होते राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचे.

ठळक मुद्देउपासनी महाराजांनी कीर्तनातून मांडला जीवनपट : शेवाळकर स्मृती राष्ट्रीय कीर्तन महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांचा कारागृहात यातना सहन करून मृत्यू झाल्याची बातमी दामोदर, वासुदेव व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी केसरी वर्तमानपत्रात वाचली आणि देशभक्तीचे विचारचक्र त्यांच्या मनात सुरू झाले. ही धग मनात पेटत होती. पुढे इंग्रज अधिकारी रॅँडने पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा अत्याचार चालविले आणि चाफेकर बंधूंचे रक्त खवळले. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून दामोदर व बाळकृष्ण चाफेकर यांनी रॅँडची हत्या केली.हभप योगेश्वर उपासनी महाराज चाफेकर बंधूंची कथा ऐकवित होते आणि उपस्थित प्रेक्षक रोमांचित होऊन हा धगधगता जीवनपट ऐकत होते. निमित्त होते राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचे. युवा झेप प्रतिष्ठानच्यावतीने राम शेवाळकर उपाख्य नानासाहेब शेवाळकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याकरिता ‘अभिवादन शेवाळकर’ या त्रिदिवसीय राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन लक्ष्मीनगरातील राणी लक्ष्मीबाई सभागृह परिसरात करण्यात आले. या शृंखलेतील ‘चाफेकर बंधू’ या विषयावरील पहिले पुष्प योगेश्वर उपासनी महाराजांनी मंगळवारी गुंफले. देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात बाळ गंगाधर टिळकांची प्रेरणा घेऊन चाफेकर बंधूंंनी आपले प्राण देशास स्वाधीन केले. चाफेकर बंधू जाज्वल्य देशभक्त होते. चाफेकर बंधूंचा संपूर्ण जीवनपट उपासनी महाराजांनी कीर्तनातून नागपूरकरांच्या पुढे मांडला. लोकमान्य टिळकांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमात दामोदर चाफेकरांचे शिवचरित्रावरील व्याख्यान तसेच गोफन्या मित्रमंडळाची स्थापना, चाफेकर बंधूनी रँडची हत्या कशा प्रकारे केली आदी जीवनप्रसंग उपासनी महाराजांनी आपल्या उद्बोधनातून जिवंत केले.कीर्तन सादर करताना तबल्यावर प्रमोद बावने, व्हायोलिनवर सुधीर गोसावी, तालवाद्यावर श्रुती वाघ व हार्मोनियमवर श्रीकांत पिसे यांनी साथसंगत दिली. सायंटिफिक सोसायटीचे अध्यक्ष अरविंद गडीकर व नानासाहेब शेवाळकर यांची शिष्या माया ठाकरे यांच्या हस्ते महोत्सवाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रफुल्ल माटेगावकर, गजानन निशितकर, प्रसाद ओक, बाळासाहेब गजभिये यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर