लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसंग्राम १७-१८ वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत होती. मात्र त्यांच्या सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न रेंगाळत ठेवला. मराठा-कुणबी समाजाचा एकही प्रश्न सोडविला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र मराठा समाजाला न्याय दिला आहे, असे प्रतिपादन शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी केले. ‘शिवसंग्राम’तर्फे आयोजित जाहीर मेळाव्यादरम्यान ते बोलत होते.सक्करदरा चौकातील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी, माजी खासदार दत्ता मेघे, भाजपाचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ.भारती लव्हेकर, माजी आमदार मोहन मते, अशोक मानकर, शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक दीपक चौधरी, नागेश सहारे, रा.स.प.चे लोकेश रसाळ, शिवसंग्रामचे शहराध्यक्ष दीपक मते, कार्याध्यक्ष विजय रसाळ, संजय भेंडे, जयंत खळतकर प्रामुख्याने उपस्थित होते. निवडणुकीच्या वेळी लोकांना आपली जात आठवते. काही नेते धूमकेतूसारखे निवडणूकीच्या वेळी येतात व जातीच्या नावावर मतं मागतात. मात्र निवडणूक झाल्यावर ते जात, लोक, समाजाचे प्रश्न विसरतात.यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर नितीन गडकरी यांनीच खऱ्या अर्थाने दिल्ली गाजविली आहे व देशाच्या राजधानीत मराठी माणसाला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. मात्र दुर्दैवाने मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढताना दिसून येतो, असेदेखील विनायक मेटे म्हणाले. यावेळी मराठा महासंघाचे नागपूर अध्यक्ष नरेंद्र मोहिते व सल्लागार प्रशांत मोहिते यांनी समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला.शिवराय हे माझ्यासाठी आई-वडिलांहून मोठे दैवत : गडकरीलहानपणापासूनच माझ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे संस्कार झाले. माझ्या आयुष्यात आईवडिलांपेक्षा मोठे दैवत शिवराय हेच आहेत. माझे त्यांच्यावर इतर कुणापेक्षाही जास्त प्रेम आहे. माझ्याप्रमाणेच पंतप्रधान मोदी हेदेखील शिवाजी महाराजांचे भक्त आहेत, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. मराठा समजाने प्रगती साधण्यासाठी संकल्प केला पाहिजे. सामाजिक, आर्थिकसह, शैक्षणिक व सांस्कृतिक मागासलेपणदेखील हटले पाहिजे. मराठा समाजाने व्यक्तीनिर्माणाचे काम करावे व समाजातील मुलांना विविध क्षेत्रात समोर जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले. नागपुरच्या ‘मिहान’चा जुन्या मुख्यमंत्र्यांनी ‘बँडबाजा’ वाजविला असेदेखील ते म्हणाले.
फडणवीस-गडकरींनी मराठा समाजाला न्याय दिला : विनायक मेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 12:23 AM
शिवसंग्राम १७-१८ वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत होती. मात्र त्यांच्या सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न रेंगाळत ठेवला. मराठा-कुणबी समाजाचा एकही प्रश्न सोडविला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र मराठा समाजाला न्याय दिला आहे, असे प्रतिपादन शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी केले. ‘शिवसंग्राम’तर्फे आयोजित जाहीर मेळाव्यादरम्यान ते बोलत होते.
ठळक मुद्देगडकरींनी दिल्लीत मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळवून दिली