शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

अपयश म्हणजे अंत नाही

By admin | Published: June 01, 2017 2:17 AM

मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. हा निकाल तसा बारावीचा होता, आयुष्याचा नव्हता.

हे आहेत आयुष्याचे शिल्पकार : प्रतिकूलतेवर मात करून घडविला इतिहास लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. हा निकाल तसा बारावीचा होता, आयुष्याचा नव्हता. पण, मनासारखे यश न मिळाल्याने अंतर्बाह्य खचलेल्या वणीच्या कोमल चचाणे हिने गळफास घेतला, औरंगाबादच्या मनीषा गायकवाड हिने स्वत:ला रेल्वेसमोर झोकून दिले, नवी मुंबईतील पृथ्वी व्हावळ यानेही फास गळ्यात अडकवला. केवळ विद्यार्थीच नाहीत तर एका ठिकाणी पालकाने मुलाला अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून स्वत:लाच संपवून टाकले. किती टोकाचे नैराश्य? इतकी अशक्त झालीत आमची मने? परीक्षेतील अपयश हे आयुष्याच्या अंताचे कारण होऊ शकते का? पण, पालकांच्या तथाकथित प्रतिष्ठेपोटी निर्माण झालेले प्रचंड अपेक्षांचे ओझे मुलांना पेलवत नाही आणि ते अशा आत्मघाताकडे वळतात. प्रतिकूलतेचे असे प्रसंग राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, व्यावसायिक, प्रसिद्ध कलावंत, अशा सर्वांनीच पाहिले. परंतु ध्येयाप्रति प्रामाणिक निष्ठा आणि स्वत:वरचा आत्मविश्वास या बळावर यांनी खेचून आणला यशाचा मंगलकलश. सारांश... कुठलेही अपयश म्हणजे आयुष्याचा अंत नसतो, हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी लोकमतने पुढाकार घेतला असून आज आयकॉन ठरलेल्यांनी अपयशातूनच कसा यशाचा मार्ग शोधला त्याचीच ही काही प्रेरणादायी उदाहरणे... इंजिनिअरिंग की वकिली अशा द्वंद्वात मी सापडलो होतो. वकील व्हायची माझी इच्छा नव्हती. पण, वडिलांनी मला समजावले आणि शेवटी मी एल.एल.बी.ला प्रवेश घेतला. सुरुवातीला वाटायचे की आपण चुकीचे तर करत नाही ना? पण, इंजिनिअरिंग किंवा आयएएस झाल्यानंतर मिळाले नसते तो आनंद आज मला न्यायदानाच्या क्षेत्रात मिळत आहे. आज मला माझे करिअर घडविल्याचा अभिमान वाटतो. द्वंद्वांचे असे प्रसंग आयुष्यात येतच असतात. शेवटी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. - न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालय. मुलाला इंजिनिअर बनवू शकत नाही याचे दु:ख आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते. शेवटी पैशाअभावी प्रवेश घेऊ शकलो नाही. बीएस्सीला प्रवेश घेतला. पण मी नैराश्याच्या गर्तेत बुडालो होतो. तणावात मी बीएस्सी सेकंड इयर सोडले. गावात किराणा दुकान सुरू केले. दूध विकू लागलो. तेथे मन रमत नव्हते. शेवटी आॅटो चालवला.सोबतीला सामाजिक काम होते. याच सामाजिक आंदोलनातून राजकारणात आलो. नैराश्यावर मात करून मी माझ्या आयुष्याची नवी वाट निर्माण केली. - चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री, नागपूर आयआरएससाठी निवडल्या गेलो. पण, ते माझे ध्येयच नव्हते. पुन्हा नव्याने परीक्षा दिली आणि तिसऱ्या प्रयत्नात आयएएससाठी सिलेक्ट झालो. जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण केले. दहावीला ८०.१४ टक्के गुण पडले. मेरिट आलो नाही म्हणून निराश झालो नाही. आणखी अभ्यास केला. बारावीला ८८.५० टक्के गुण मिळाले. यूपीएससीची तयारी सुरुच होती. पहिल्या प्रयत्नात खूप कमी फरकाने संधी हुकली. वाईट वाटले परंतु निराश झालो नाही.आणखी जिद्दीने अभ्यास केला. सचिन कुर्वे , जिल्हाधिकारी, नागपूर