लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने दोन हजार रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या महिला आरोपीला कमाल सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी सोमवारी हा निर्णय दिला.पद्मा अरुण ठवरे (४१) असे आरोपीचे नाव असून, ती टेका नाका येथील रहिवासी आहे. तिला भादंविच्या कलम ४८९-बी अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास तर, कलम ४८९-सी अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. १४ जुलै २०१७ रोजी दुपारी ४ च्या सुमारास आरोपी महिला ही फिर्यादी भाऊराव मेश्राम यांच्या दुकानात भांडे खरेदी करण्यासाठी गेली होती. तिने ३०० रुपयांचे भांडे खरेदी केले व मेश्राम यांना दोन हजार रुपयांची नोट दिली. त्या नोटेवर मेश्राम यांना संशय आला. अधिक बारकाईने निरीक्षण केले असता नोट बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मेश्राम यांनी पाचपावली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मेश्राम यांच्या दुकानात पोहोचून पद्माची तपासणी केली असता दोन हजार रुपयांच्या आणखी तीन बनावट नोटा आढळून आल्या होत्या. न्यायालयात शासनातर्फे अॅड. एल. बी. शेंद्रे यांनी बाजू मांडली.
बनावट नोटा प्रकरण : महिलेला सात वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 9:36 PM
सत्र न्यायालयाने दोन हजार रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या महिला आरोपीला कमाल सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी सोमवारी हा निर्णय दिला.
ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय