लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या भितीने व क्वारंटाइन होऊन आपणही बाधित होऊ या गैरसमजूतीने एका कुटुंबाने स्वत:ला कुुलुपात बंद केले होते. याची महिती मनपाच्या सतरंजीपुरा झोनला मिळताच त्यांनी घराची वीज कापली. त्यानंतर ते बाहेर येत नसल्याचे पाहत ध्वनीक्षेपकाद्वारे त्यांना क्वारंटाइन होण्याचे आवाहन केले. अखेर शुक्रवारी रात्री ८.३० वाजता घरातील आठही सदस्य घराबाहेर आले.सतरंजीपुऱ्यातील कोरोनाबाधित मृताकडून व त्याच्या नातेवाईकांकडून आतापर्यंत ६० वर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. खबरदारी म्हणून सतरंजीपुऱ्यातील संशयितांना १४ दिवसांचे क्वारंटाइन केले जात आहे. या वसाहतीतील २५०वर नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. २३ एप्रिल रोजी याच वसाहतीतील १५० लोकांना पुन्हा क्वारंटाइन केले. याच परिसरात एक मजल्याच्या या घरातील कुटुंबाने खालच्या दरवाजाला बाहेरून कुलूप स्वत:ला कोंडून घेतले. याची माहिती नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त विजय हुमने यांना मिळाली. त्यांनी याची गंभीर दखल घेतली. शहनिशा केली असता, संबंधित घरातून कुलरचा आवाज त्यांना आला. त्यांनी ध्वनीक्षेपकामधून बंद घरातील लोकांना बाहेर येण्याचे आवाहन केले. परंतु कोणीच घराबाहेर येत नसल्याचे पाहत, नाइलाजेने घरातील वीज कापली. रात्री ८.३० वाजाताच्या सुमारास त्यांना पुन्हा ध्वनीक्षेपकातून आवाहन केले. त्यानंतर दडून बसलेले लोक बाहेर आले. त्यांनी स्वत:हूनच कुलूपही उघडले. मनपाच्या पथकाने घरातील आठही लोकांना बसमध्ये बसवून संस्थात्मक अलगीकरणात दाखल केले.
कोरोनाबाधिताच्या कुटुंबियांनी भयापोटी स्वत:ला घेतले कोंडून; नागपुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:52 AM
कोरोनाच्या भितीने व क्वारंटाइन होऊन आपणही बाधित होऊ या गैरसमजूतीने नागपुरातील एका कुटुंबाने स्वत:ला कुुलुपात बंद केले होते.
ठळक मुद्देसतरंजीपुऱ्यातील वास्तवकोरोनाबाधित मृतक कुटुंबातील सदस्य