लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जंक फूड हे लहान मुलं आणि तरुण वर्गामध्ये अतिशय लोकप्रिय ठरले आहे; परंतु या पदार्थांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे वैद्यकीय जगताची डोकेदुखी ठरले आहे. या पदार्थांमुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. या लठ्ठ व्यक्तीमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांचे प्रमाण लहान वयातच दिसू लागले आहे. यामुळे पालकांनी वेळीच सावध होऊन, मुलांना जंक फूडपासून दूर ठेवणे हिताचे आहे, असे मत बालरोगतज्ज्ञ संघटनेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पीयूष गुप्ता यांनी येथे व्यक्त केले.राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटना नागपूर शाखेचा पदग्रहण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग होत्या. यावेळी डॉ. उदय बोधनकर, मावळते अध्यक्ष डॉ. रवींद्र भेलोंडे, मावळते सचिव डॉ. महेश तुराळे,डॉ. मीनाक्षी गिरीश, डॉ. स्मिता देसाई उपस्थित होते. यावेळी डॉ. राणी बंग व डॉ. कविता सातव यांचा बाल आरोग्य रक्षणासाठी विशेष सत्कार करण्यात आला. सोबतच डॉ. मराठे, डॉ. कोतवाल, डॉ. अनिल राऊत, डॉ. शिवलकर, डॉ. विंकी रुघवानी, डॉ. अविनाश गावंडे या डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्यात आला.डॉ. शुभदा खिरवडकर अध्यक्ष तर डॉ. मुस्तफा अली सचिवकार्यकारिणीत अध्यक्ष डॉ. शुभदा खिरवडकर, सचिव डॉ. मुस्तफा अली, उपाध्यक्ष डॉ. ऋषी लोढाया, डॉ. अंजू कडू, सहसचिव डॉ. स्मिता देसाई व डॉ. शिल्पा भोयर, कोषाध्यक्ष डॉ.पंकज अग्रवाल, आगामी अध्यक्ष डॉ. विजय धोटे, कार्यकारिणी सभासद डॉ. अभिजित भारद्वाज, डॉ. आकाश बंग, डॉ. अलका जोगेवार, डॉ. अमित डहाट, डॉ. अर्चना जयस्वाल. डॉ. दिनेश सरोज, डॉ. हिमांशु दुआ, डॉ. कमलाकर देवघरे, डॉ. अलका ब्राह्मणकर, डॉ. ज्योती चव्हाण, डॉ. मंजुषा गिरी, डॉ. मीना. देशमुख व डॉ. मिलिंद मंडलिक, डॉ मोहिब हक, डॉ संगीता गेडाम, डॉ. स्वाती वाघमारे, डॉ. स्वप्नील भिसिकर, व डॉ. योगेश पांडे, विशेष आमंत्रित सदस्य डॉ. अविनाश गावंडे, डॉ. राजेंद्र सावजी, डॉ. भाग्यलक्ष्मी राजन, डॉ. अमित नेमाडे, डॉ. शिरीष मोदी, डॉ. विराज शिंगाडे व डॉ हिमांशु पाटील आदींचा समावेश आहे.
जंक फूड दुष्परिणामाच्या विळख्यात लहान मुले : पीयूष गुप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:11 PM
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांचे प्रमाण लहान वयातच दिसू लागले आहे. यामुळे पालकांनी वेळीच सावध होऊन, मुलांना जंक फूडपासून दूर ठेवणे हिताचे आहे, असे मत बालरोगतज्ज्ञ संघटनेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पीयूष गुप्ता यांनी येथे व्यक्त केले.
ठळक मुद्देराष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचा पदग्रहण सोहळा