लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘हायरिस्क’ व ‘लो रिस्क’ संपर्कातील नागरिकांचा शोध (ट्रेसिंग) घेऊन तपासणी करण्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी, प्रत्यक्षात दारावर स्टीकर लावण्यापलिकडे ट्रेसिंग व टेस्टिंग होत नसल्याचे समोर आले आहे. अपुऱ्या यंत्रणामुळे अनेक बाधितांच्या संपर्कातील लोकांची चाचणी होत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत या महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात कमालीची वाढ झाली आहे. दोन हजारावर गेलेली रुग्णसंख्या आता १२०० वर आली आहे. परंतु मृत्यूची संख्या अद्यापही ४० ते ५० दरम्यान असल्याने कोरोनाची दहशत कायम आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संशयित कोरोनाबाधितांची चाचणी होणे, पॉझिटिव्ह आल्यास उपचाराखाली आणणे, रुग्णाच्या जवळून संपर्कात आलेल्या म्हणजे ‘हायरिस्क’ व दुरून संपर्क आलेला म्हणजे ‘लो रिस्क’ नागरिकांचा शोध घेणे आवश्यक असते. यात साधारण १३ ते २० लोकांची तपासणी करणे अपेक्षित असते. सोबतच रुग्णांच्या परिसरात सर्वेक्षण करणे गरजेचे असते. मात्र, ‘ट्रेसिंग’, ‘टेस्टिंग’ व सर्वेक्षण प्रत्यक्षात होत नसून बोजवारा उडल्याचे चित्र आहे. -मुंढे यांच्या काळात ‘ट्रेसिंग’, ‘टेस्टिंग’वर होता जोर तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे कार्यरत असताना त्यांनी ‘ट्रेसिंग’, ‘टेस्टिंग’ व सर्वेक्षणावर विशेष भर दिला होता. परंतु त्यांची बदली होताच आता याकडे दुर्लक्ष होत असल्याचे खुद्द रुग्णांचे म्हणणे आहे.नाव लिहून घेतले परंतु संपर्कच केला नाहीएका कोरोनाबाधित रुग्ण महिलेने ‘लोकमत’ला सांगितले, पतीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मनपाकडून कुठलाही फोन आला नाही. स्वत:हून कोविडची तपासणी केली. तपासणीनंतर दोन दिवसाने मनपाकडून फोन आला. त्यांनी पत्ता विचारून घराला भेट दिली. कोणकोण संपर्कात आले यांची नावे लिहून घेतली. घराला स्टीकर लावले. परंतु नंतर काहीच केले नाही.ट्रेसिंगची आकडेवारी देण्यास टाळाटाळशहरात आतापर्यंत किती लोकांचे ट्रेसिंग केले याची माहिती मनपाच्या संबंधित विभागाला मागितली असता मागील दोन आठवड्यापासून टाळटाळ करीत आहे. या संदर्भात मनपाचे अप्पर आयुक्त राम जोशी यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही या संदर्भातील माहिती मागितली, परंतु यांच्याकडूनही कुठलेच उत्तर मिळाले नाही.
नागपुरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा उडाला बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:35 AM
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘हायरिस्क’ व ‘लो रिस्क’ संपर्कातील नागरिकांचा शोध (ट्रेसिंग) घेऊन तपासणी करण्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी, प्रत्यक्षात दारावर स्टीकर लावण्यापलिकडे ट्रेसिंग व टेस्टिंग होत नसल्याचे समोर आले आहे.
ठळक मुद्देकशी तुटणार कोरोनाची साखळी? : ‘हायरिस्क’ व ‘लोरिस्क’ संपर्कातील लोकांपर्यंत पोहचले जात नाही