जलालखेडा : आर्थिक विवंचनाेत असलेल्या शेतमजुराने शेतातील धुऱ्यावर असलेल्या झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील लाेहारीसावंगा शिवारात शुक्रवारी (दि. १२) सकाळी घडली.
बंडू केशव मानेराव (५५, रा. लाेहारीसावंगा, ता. नरखेड) असे मृताचे नाव आहे. ते शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. काही दिवसांपूर्वी ते गावातील एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून कामाला हाेते. परंतु, शेतकऱ्याने त्यांना कामावरून कमी केले हाेते. तेवहापासून त्यांच्या आर्थिक अडचणी वाढत गेल्या. त्यातच ते शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास काही ग्रामस्थांना दिसले हाेते. त्यानंतर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास माराेती पाटील व व्यंकाेजी पाटील यांच्या शेताच्या धुऱ्यावरील कडूनिंबाच्या झाडाच्या फांदीला त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास प्रजाेग तायडे करीत आहेत.