लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : शेताजवळ बकऱ्या चारत असताना शेतमजुराचा कुंपणाच्या तारांना स्पर्श झाला. त्या तारांमध्ये वीजप्रवाह प्रवाहित असल्याने त्याला जाेरात विजेचा धक्क लागला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील थडीवपनी (ता. नरखेड) नजीकच्या बरडपवनी शिवारात रविवारी (दि. १९) सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
किसना बापूराव टेकाम (६०, रा. बरडपवनी, ता. नरखेड) असे मृताचे नाव आहे. रामदास सावरकर यांची बरडपवनी शिवारात शेती असून, ती शेती बाळकृष्ण सोनुले यांनी ठेक्याने कली आहे. त्यांनी वन्यप्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेताच्या कुंपणाला असलेल्या तारांमध्ये वीजप्रवाह प्रवाहित केला हाेता. हा वीजप्रवाह खंडित करण्यापूर्वीच किसना टेकाम हे त्यांच्या शेताजवळ बकऱ्या चारत हाेते.
दरम्यान, त्यांचा अनावधानाने तारांना स्पर्श झाला आणि विजेचा जाेरात धक्का लागल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात पाठविला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी भादंवि ३०४, वीजचाेरी अधिनियम १३४ अन्वये गुन्हा नाेंदवून बाळकृष्ण साेनुले यांना अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार हरिश्चंद्र गावडे करीत आहे.
...
सहा महिन्यातील दुसरी घटना
कुंपणाच्या तारांमध्ये वीजप्रवाहित केल्याने मजुरांचा मृत्यू हाेण्याची या भागातील सहा महिन्यातील ही दुसरी घटना हाेय. खलानगाेंदी (ता. नरखेड) शिवारात ११ एप्रिल २०२१ राेजी कलाबाई कुंभरे व सुशीलाबाई दहीवडे, दाेघेही रा. खलानगाेंदी या दाेन महिला मजुरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला हाेता. या दाेघींचा शेतात काम करताना कुंपणाच्या तारांना स्पर्श झाला आणि विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या प्रकरणात नाना बेले व त्यांचा मुलगा चंद्रशेखर बेले या दाेघांना अटक करण्यात आली हाेती.
...
वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान
या शिवारात काही वर्षांपासून वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. ते पिकांचे प्रचंड नुकसान करीत असल्याने तसेच वन विभाग वन्यप्राण्यांचा कामयचा बंदाेबस्त करीत नसल्याने पिकांचे रक्षण करण्यासाठी बाळकृष्ण साेनुले यांनी शेताच्या कुंपणाच्या तारांमध्ये वीजप्रवाह प्रवाहित केला हाेता. ते राेज रात्री तारांमध्ये वीजप्रवाह प्रवाहित करायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वीजप्रवाह खंडित करायचे.
200921\img_20210920_140621.jpg
फोटो ओळी. मृत किसणा टेकाम.