लाेकमत न्यूज नेटवर्क
केळवद : शेतात काम करीत असताना पावसाला सुरुवात हाेताच शेतकरी महिलेसह महिला मजुरांनी शेतातील झाेपडीत आश्रय घेतला. त्यातच जाेरात कडाडलेली वीज थेट झाेपडीवर काेसळल्याने शेतकरी महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दाेन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना केळवद (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रायबासा शिवारात शनिवारी (दि. ५) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
अंजना जंगलू मरस्कोल्हे (६५) असे मृत तर गीता सुनील कुंभरे (३५) व मंजू दौलत मरकाम (४०, तिघीही रा. रायबासा, ता. सावनेर) अशी जखमी महिलांची नावे आहेत. गीता व मंजू अंजना मरस्काेल्हे हिच्या रायबासा शिवारातील शेतात कचरा वेचणीची कामे करीत हाेत्या. अंजनादेखील त्यांना मदत करीत हाेती. मध्येच पावसाला सुरुवात झाल्याने या तिघींनीही लगेच शेतातील झाडाखाली आश्रय घेतला. विजा जाेरात कडाडत असल्याने तसेच पावसाचा जाेर वाढल्याने या तिघीही घाबरल्या आणि त्यांनी लगेच शेतातील झाेपडीत आश्रय घेतला.
दरम्यान, जाेरात कडाडलेली वीज थेट झाेपडीवर काेसळली. त्यात झाेपडीतील तिघीही हाेरपळल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यातच अंजना मरस्काेल्हे या शेतकरी महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच सरपंच सोनू रावसाहब, सतीश राव व नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी दाेन्ही जखमी महिलांना उपचारासाठी सावनेर येथे पाठविण्याची व्यवस्था केली.
पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. केळवद प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. किशाेर गजभिये, तलाठी नीता पाटील यांच्या उपस्थितीत ठाणेदार दिलीप ठाकूर, देवराव पंचबुद्धे व रवींद्र चटप यांनी पंचनामा केला. या प्रकरणी केळवद पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला.
...
पाळीव कुत्र्याचाही मृत्यू
अंजना मरस्काेल्हे यांच्यासाेबत त्यांचा पाळीव कुत्राही शेतात हाेता. पाऊस सुरू झाल्याने कुत्रादेखील त्यांच्या मागे आधी झाडाखाली आणि नंतर झाेपडीत गेला. वीज काेसळल्याने अंजना यांच्यासाेबत त्यांचा कुत्राही हाेरपळला आणि त्याचा काही वेळात झाेपडीतच मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या दाेन्ही महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. दुसरीकडे, मृत व जखमींच्या कुटुंबीयांना शासनाने याेग्य आर्थिक मदत करावी, अशी मागणीही केली जात आहे.