लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: उपराजधानीत आयोजित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बुधवारी सकाळी पोलिसांनी अडवल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तणावाची स्थिती निर्माण झाली. परतीच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करावी शेतकऱ्यांना भरपाई मिळावी या हेतूने निवेदन देण्यासाठी विदर्भ आंदोलन समितीचे प्रमुख राम नेवले हे आपल्या कार्यकर्त्यांसह निघाले असताना ही घटना घडली.सकाळी ११.३० च्या सुमारास आकाशवाणी चौकात आंदोलनाचे कार्यकर्ते पोहचले असता, पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यापासून रोखले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. याप्रसंगी पोलिस अधिकाऱ्यांसोबत झटापट झाल्याचेही वृत्त आहे. भाव मिळत नसल्याने व परतीच्या पावसाने नुकसान सहन करावे लागत असल्याने संत्री उत्पादकांनी चिडून या आंदोलनात आपल्या बगिच्यातील संत्री रस्त्यावरील नागरिकांना फुकट वाटली.अधिक वृत्त लवकरच देत आहोत.
पोलिसांनी अडवल्यामुळे नागपुरात शेतकरी आंदोलनकर्ते संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 12:43 PM
उपराजधानीत आयोजित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बुधवारी सकाळी पोलिसांनी अडवल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तणावाची स्थिती निर्माण झाली.
ठळक मुद्देविदर्भ आंदोलन समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन