लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भासह नागपूर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहे. शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करा, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले असले तरी अनेक शेतकऱ्यांनी थोडा पाऊस झाल्यानंतर पेरण्या केल्या, मात्र आता पिके जगविण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहेत. शेतकऱ्यांनी महागडे बियाणे घेऊन पेरण्या केल्या आहे. चांगला पाऊस नसल्याने केलेली पेरणी उलटण्याची धोका असल्याने शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यात जेमतेम ४३.५९ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुका वगळता इतर कुठल्याही तालुक्यात २९ जूनपर्यंत पावसाने सरासरी गाठलेली नाही. जिल्ह्यात ७९ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर स्प्रिंकलरने पाणी देण्याची वेळ आली आहे. जिल्हयातील एकूण ४ लाख ६५ हजार ३२७ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी २ लाख २ हजार ८१३ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. यात कपाशीच्या एकुण २ लाख १६ हजार ३६१ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख २३ हजार ८०९ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. सोयाबीनच्या ९५ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रापैकी ५२ हजार ६८१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तूर ५२ हजार २९३ हेक्टर पैकी २५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. भाताच्या पिकासाठी आवश्यक असा पाऊस न झाल्याने ९४ हजार ५९४ हेक्टर क्षेत्रापैकी फक्त २३९ हेक्टर क्षेत्रात लावणी झाली आहे.
तीन तालुक्यात १०० मि.मी पाऊस नाहीजिल्ह्यातील रामटेक, पारशिवणी व सावनेर तालुक्यात अनुक्रमे ९१.२ मि.मी., ७४.५ व ६९.४ मि.मी पाऊस झाला. या तालुक्यात अद्याप १०० मि.मी. पाऊस झालेला नाही. तर नरखेड व काटोल तालुक्याने सरासरी ओलांडली असून अनुक्रमे १५७.३ मि.मी. व १७५.१ मि.मी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पिकाखालील क्षेत्र(हेक्टर) व झालेली पेरणीपिक एकूण क्षेत्र झालेली पेरणी टक्केवारीकापूस २१६३६१ १२३८०९ ५७.२२सोयाबीन ९५५९५ ५२६२१ ५५.२५तूर ५२, २९३ २५३०७ ४८.३९भात ९४५९४ २३९ ०.२५