भिवापूर : तालुक्यातील अर्ध्याहून अधिक गावे जंगल प्रभावित असल्याने हिंस्त्र श्वापदांसह इतर वन्यप्राण्यांच्या उपद्व्यापामुळे शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थ त्रस्त आहेत. शेतात व गावात होणारा वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार थांबवावा, अशी मागणी जोर धरत असली तरी वनविभागाकडून मात्र पर्यायी उपाययोजना होताना दिसत नाही. माजी आमदार सुधीर पारवे यांच्यासह सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार यांनी गुरुवारी तालुक्यातील जंगलव्याप्त गावांचा दौरा करीत ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
नांद, महालगाव, झमकोली, उरकुडापार, महालगाव, बेसूर, चिखलापार, जवळी, सोमनाळा, रानमांगली, कारगाव, अड्याळ, नागतरोली, पुल्लर आदी गावांमध्ये वाघ, बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांचा उपदव्याप सतत सुरू आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी शेतात जागली करतात. मात्र वाघ, बिबट व रानडुक्कर या हिंस्त्र श्वापदांमुळे शेतात जागलीला जाणेसुद्धा कठीण झाले आहे. यावेळी भास्कर येंगळे व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
020921\fb_img_1630593346856.jpg
सहायक वन संरक्षक नरेंद्र चांदेवार व माजी आ. सुधीर पारवे संवाद साधतांना