नागपूर : कृषी विभागाच्यावतीने सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १,२७६ शेतकऱ्यांनी सोयाबीनचे ८,२४१ क्विंटल बियाणे राखले आहे.
नागपूर जिल्ह्यात मागील २०२० या वर्षी सोयाबीन पिकाखालील क्षेत्र १ लाख दोन हजार हेक्टर होते. कृषी विभागामार्फत सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम शेतकरी स्तरावर राबविला होता. त्यापासून तयार होणारे बियाणे खरीप हंगाम २०२१ मध्ये वापरण्यासाठी प्रचार, प्रसिद्धी करण्यात आली होती. यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते. पुढील खरीप हंगामामध्ये सोयाबीन बियाणांची कमतरता लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी उन्हाळी सोयाबीन पिकाची ७८७ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली असून त्यापासून ६ ते ७ हजार क्विंटलपर्यंत सोयाबीन बियाणे उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
...
यंदाच्या खरिपासाठी ६१ हजार सोयाबीन बियाणांची गरज
खरीप हंगाम २०२१ करिता नागपूर जिल्ह्यामध्ये ८५ हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीन पीक लागवडीसाठी निश्चित केले आहे. यासाठी ७५ किलो प्रति हेक्टरप्रमाणे जवळपास ६१ हजार क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने नियोजन आखले असून एकूण लागणाऱ्या बियाणांपैकी खरीप व उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमामार्फत शेतकरीस्तरावर राखून ठेवण्यात आलेले १५ हजार क्विंटल बियाणे, महाबीजमार्फत २० हजार क्विंटल, राष्ट्रीय बीज निगममार्फत ३ हजार क्विंटल व खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून २५ हजार क्विंटल बियाणांचे नियोजन आहे.
...
नैसर्गिक आपत्तीमुळे येत्या खरीप हंगामामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बियाणांची टंचाई होण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकऱ्यांनी राखून ठेवलेले सोयाबीन बियाणे तसेच खरीप व रब्बी उन्हाळी हंगामामध्ये ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमाद्वारे उत्पादित बियाणांचा वापर करावा. लागवड करण्यापूर्वी घरगुती पद्धतीने स्थानिक पातळीवर उगवण क्षमता तपासणी करूनच लागवड करावी. उगवण क्षमता तपासून घ्यावी.
- मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी
...