शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

शेतकऱ्यांनीच क्रांतीची मशाल हातात घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 11:02 AM

शेतकऱ्यांनी क्रांतीची मशाल हाती घेण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेत्यांनी केले.

ठळक मुद्देकिसान अधिकार यात्रेचे स्वागतशेतकरी नेत्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ४५ वर्षांत काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच न केल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन ते आत्महत्येकडे वळले. शेतकऱ्यांना या कर्जातून बाहेर काढून अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भारतीय जनता पक्षानेही शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे शेतकरी आत्महत्या आणखीनच वाढल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता ही आरपारची लढाई असून, शेतकऱ्यांनी क्रांतीची मशाल हाती घेण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेत्यांनी केले.काश्मीर ते कन्याकुमारी किसान अधिकार यात्रेचे गुरुवारी दुपारी ३ वाजता संविधान चौकात आगमन झाले. यात्रेत सहभागी विविध राज्यातील शेतकरी नेत्यांचे स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर माजी खासदार नाना पटोले, आमदार बच्चू कडू, जय जवान जय किसान संघटनेचे संयोजक प्रशांत पवार, काश्मीरचे शेतकरी नेते हमीद मलिक, मध्य प्रदेशचे शेतकरी नेते शिवकुमार शर्मा, यात्रेचे समन्वयक अभिमन्यू कोहाड, हरियाणाचे गुरुनाम चंडोणी, पंजाबचे जगजितसिंह दल्लेवाल, उत्तर प्रदेशचे हरपालसिंह, राजस्थानचे सतबीरसिंह, केरळचे ए. बी. बिजू, कर्नाटकचे शांताकुमारजी, छत्तीसगडचे राजकुमार गुप्ता उपस्थित होते. माजी खासदार नाना पटोले यांनी उद्योगपतींकडून टॅक्स वसूल करून तो गरिबांचे आरोग्य, शिक्षणासाठी वापरण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धोरण होते. परंतु भाजप सरकार गरिबांकडून वसूल करून उद्योगपतींच्या घशात पैसे ओतत असल्याचा आरोप केला. इंग्लंडप्रमाणे शासनाने शेतीत ८५ टक्के भागीदारी करण्याची मागणी करून आगामी निवडणुकीत भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी ईव्हीएम मशीनविरुद्ध आवाज बुलंद करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. आमदार बच्चू कडू यांनी भारताला बदलविण्यासाठी शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले. अन्यथा भगतसिंग यांच्या मार्गावर जाऊन किसान संघटनेचे किसान सैन्यात रूपांतर करण्याची गरज भासणार असल्याचे ते म्हणाले. अभिमन्यू कोहाळ यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसून शासनाकडून त्या झालेल्या हत्या असल्याचा उल्लेख केला. हमीद मलिक यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येत असल्याचे सांगितले. गुरुनाथसिंग चंदुरी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे १५ दिवसाचे वेतन आणि शेतकऱ्यांची वर्षभराची कमाई सारखी असल्याचे सांगून यामुळेच आत्महत्या वाढल्याचे मत व्यक्त केले. सुरेश खोत यांनी शासनाची धोकेबाजी उघड करण्यासाठी ही यात्रा काढल्याचे स्पष्ट केले. शिवकुमार शर्मा यांनी पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांची लूट करणारी असल्याचे मनोगत व्यक्त केले. संचालन अक्षता दमने यांनी केले. प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन श्रीकांत तराळ यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरी