शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

शेतकऱ्यांच्या आत्महत्या नक्की थांबणार

By admin | Published: September 11, 2016 2:06 AM

पतंजली फूड आणि हर्बल पार्कमुळे शेतकऱ्यांना कृषी मालासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन : मिहानमध्ये पतंजली फूड व हर्बल पार्कचे भूमिपूजननागपूर : पतंजली फूड आणि हर्बल पार्कमुळे शेतकऱ्यांना कृषी मालासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यांच्या कृषी मालाला चांगली किंमत मिळेल आणि मध्यस्थांद्वारे शेतकऱ्यांची लुबाडणूक होणार नाही. त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊन तो आत्महत्या करणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना आणि मुलांना प्रशिक्षण व रोजगार मिळणार आहे. पतंजलीने गुणवत्तेची स्वदेशी उत्पादने लोकांना उपलब्ध करून देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. पतंजलीच्या मिहान-सेझमधील अविकसित २३० एकरावरील फूड आणि हर्बल पार्कचे भूमिपूजन मुख्यमंंत्र्यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, योगगुरू बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, रामदास तडस, डॉ. विकास महात्मे, अजय संचेती, महापौर प्रवीण दटके उपस्थित होते.(प्रतिनिधी) जवळपास ५० हजार रोजगारनिर्मितीमुख्यमंत्री म्हणाले, जगातील सर्वात मोठा फूड पार्क मिहानमध्ये साकार होणार आहे. या पार्कमध्ये कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग असल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार आहे. उसाप्रमाणेच विदर्भात मध्यस्थांची साखळी बंद होऊन शेतकऱ्यांच्या कृषी मालाला चांगली किंमत मिळणार आहे. त्यासाठी त्यांना तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या पार्कच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या ५० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. पतंजलीने शेतीचे क्लस्टर उभारावे, अशी मागणी त्यांनी केली. विदर्भात व मराठवाड्यातील उद्योगांना ४.४० रुपये प्रति युनिट दराने वीज उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनासुद्धा १२ तास वीज मिळणार आहे. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर असल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे केंद्र असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.नियमांचे पालन करून जमीन दिलीसरकारने बाबा रामदेव यांच्या फूड पार्कला नियमांचे पालन करून जमीन दिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यासाठी सचिवस्तराच्या चार सदस्यांची समिती नेमली होती. २३० एकर जागेसाठी निविदा काढली तेव्हा फक्त पतंजलीने निविदा भरली होती. दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढली तेव्हासुद्धा एकमेव पतंजलीने निविदा भरली होती. एकच गुंतवणूकदार पुढे आल्याने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) तिसऱ्यांदा निविदा काढली. त्यावेळी पतंजलीव्यतिरिक्त कुणीही निविदा भरली नाही. त्यामुळे केंद्रीय दक्षतेच्या नियमानुसार पतंजलीला जागा देण्यात आली. कंपनीने जमिनीची किंमत निर्धारित रकमेपक्षा जास्त दिली. फूड पार्कमध्ये कुणीही जमीन घेऊ शकतोमिहानमधील फूडपार्कमध्ये ५०० एकर जागा आहे. त्यापैकी पतंजलीला २३० एकर जागा दिली आहे. आणखी २७० एकर जागा शिल्लक आहे. कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्याची कुण्या उद्योजकाची इच्छा असेल तर त्यांनी निविदा प्रक्रियेद्वारे जागा खरेदी करावी. जागेची विक्री पारदर्शकपणे करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. कृषी आधारित प्रक्रिया उद्योग उभारून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले. पतंजलीने विदर्भात उद्योग सुरू करावेत- गडकरी गडकरी म्हणाले, विदर्भात ७५ टक्के जंगल आहे. या जंगलातील आदिवासींतर्फे उत्पादित आणि अमरावती मेळघाट येथील जडीबुटी पतंजली खरेदी करणार आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली येथे मुबलक प्रमाणात जडीबुटी आहेत. गडचिरोली येथे प्रकल्पासाठी जागा सुधीर मुनगंटीवार देणार आहेत. गडकरी म्हणाले, विदर्भात शेतीपूरक रोजगार नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. या उद्योगामुळे गावातील युवकांना रोजगार मिळेल. अमरावती नांदगावपेठ येथे १२ टेक्सटाईल उद्योग सुरू झाले असून तेथे ८ ते १० हजार युवकांना काम मिळाले आहे. याशिवाय मिहानमध्ये आयटी उद्योगात जवळपास १५ हजार युवकांना रोजगार मिळाला आहे. भद्रावती येथे कोळशावर आधारित युरिया निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. देशातील गरिबी दूर होण्यासाठी स्वदेशी मालाचा उपयोग करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. मीसुद्धा पतंजलीच्या उत्पादनांचा उपयोग करीत असल्याचे गडकरी म्हणाले. पतंजली विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी उद्योग सुरू करेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.तीनपाट नेत्यांचे नावही घेणार नाहीकाँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी रामदेव बाबा यांच्या पतंजली फूडला दिलेल्या जमिनीवरून केलेल्या आरोपांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रोखठोक उत्तर दिले. ते म्हणाले, रामदेव बाबा यांना दिलेली जमीन सेझच्या बाहेर आहे. सर्व जागा नियमाप्रमाणे निविदा काढून दिली आहे. आधीच्या सरकारने मिहानमध्ये रोजगार निर्मितीसाठी काय केले ? इथे काही विघ्नसंतोषी नेते आहेत. जे सत्तेत असताना स्वत: काही करू शकले नाहीत. त्यांनी आयुष्यभर फक्त स्वत:च्या मुलांच्या रोजगाराची काळजी घेतली. त्या तीनपाट नेत्यांचे मी नावही घेणार नाही. उगीच त्या विघ्नसंतोषी नेत्यांना यामुळे महत्व मिळते, असा हल्ला गडकरींनी चढवला. सहा महिन्यांत प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणारप्रास्ताविक करताना आचार्य बालकृष्ण म्हणाले, मिहानमधील प्रकल्प पतंजलीच्या हरिद्वार येथील प्रकल्पापेक्षा चारपट मोठा आहे. शासकीय नियम आणि दरानुसार पतंजलीने २३० एकर जमीन खरेदी केली आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक १६०० कोटींची असून पहिल्या टप्प्यात १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. सर्व पैसा कर्जस्वरुपात उभारण्यात येणार आहे. या जमिनीवर प्रकल्प उभारून सहा महिन्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार आहे. पतंजलीचा नफा चॅरिटीला जाणार आहे. त्याद्वारे विकास आणि शैक्षणिक कामे करण्यात येणार आहे. प्रारंभी बाबा रामदेव यांनी जवळपास एक तास योग प्रात्यक्षिके करून दाखविली आणि साधकांना दरदिवशी करण्याचे आवाहन केले. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढून आरोग्य निरोगी राहते, असे बाबा रामदेव म्हणाले.