वेलतूर : कुही तालुक्यातील आंभोरा उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी सोडले जाणार आहे. यासंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी शुक्रवारी आ. राजू पारवे यांचे लक्ष वेधले होते. यासंदर्भात पारवे यांनी सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आंभोरा उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोडण्याचे सांगितले. यावर संबंधित अधिकाऱ्याने सप्टेंबर अखेरपर्यंत पाणीपट्टी वसुलीवर भर देण्यात यावा तसेच उद्या शनिवारपासून पाणी सोडण्यात येईल, असे स्पष्ट केले. याप्रसंगी सुनील किंदर्ले, हरिदास लुटे, बंडूपाटील तितरमारे, किसन खोब्रागडे, राजू चौधरी, नाना तितरमारे, राजू कुकडे, उमेश महाकाळकर, दुर्गेश भोयर, धनराज बडगे, सुधाकर नरुले, भारत गाडेकर, प्रदीप शेंडे, श्रीकांत सूर्यवंशी, नंदू रंगारी, जीवन बांते, कार्तिक पडोळे, विशाल पडोळे, सुधीर तलमले, प्रफुल पडोळे, आशिष पडोळे, स्नेहल पडोळे, राजेश पडोळे, कुंदन मोहुर्ले, कार्तिक शेंडे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना दिलासा, आंभोरा उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:12 AM