शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपूर जिल्ह्यात दहेगावनजीक भीषण अपघात ; २ ठार, ७ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 7:52 PM

‘सर्व्हिस रोड’वरून ‘यू टर्न’ घेत ‘फ्लाय ओव्हर’वर चढणाऱ्या वेकोलिच्या स्टाफ बस आणि ‘फ्लाय ओव्हर’वरून खाली येत असलेल्या तवेराची आपसात जोरदार धडक झाली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तवेरातील नऊ जणांपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - सावनेर मार्गावरील दहेगाव (रंगारी) (ता. सावनेर) गावाजवळ शुक्रवारी सकाळी ६.५५ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे स्टाफ बस व तवेरा आमोरासमोर धडकली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (खापरखेडा) : ‘सर्व्हिस रोड’वरून ‘यू टर्न’ घेत ‘फ्लाय ओव्हर’वर चढणाऱ्या वेकोलिच्या स्टाफ बस आणि ‘फ्लाय ओव्हर’वरून खाली येत असलेल्या तवेराची आपसात जोरदार धडक झाली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तवेरातील नऊ जणांपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - सावनेर मार्गावरील दहेगाव (रंगारी) (ता. सावनेर) गावाजवळ शुक्रवारी सकाळी ६.५५ वाजताच्या सुमारास घडली.मोहम्मद रफिक मोहम्मद शफिक अन्सारी (१८) व शेख नूर मोहम्मद शेख रहीम (१८) दोघेही रा. यशोधरानगर, नागपूर अशी मृत तरुणांची नावे असून, जखमींमध्ये इरफान हबीबउल्लाह अन्सारी (१५), मोहम्मद रईस मोहम्मद सईद अन्सारी (२०), रियाजउद्दीन अन्सारी सलाहउद्दीन अन्सारी (१६), शमीम अख्तर शफिक अहमद (१८), गयासउद्दीन अन्सारी सलाहउद्दीन अन्सारी (१८), शेख असिफ शेख अजीज (२४) व बाबू ऊर्फ शोहेब अन्सारी (१७) सर्व रा. यशोधरानगर, नागपूर यांचा समावेश आहे.हे सर्व जण वाकी (ता. सावनेर) येथील कव्वालीचा कार्यक्रम आटोपून एमएच-१२/जीझेड-१३९३ क्रमांकाच्या तवेराने नागपूरला येत होते. त्यांचे वाहन दहेगाव (रंगारी) येथील ‘फ्लाय ओव्हर’वरून उतरत असतानाच वेकोलिच्या एमएच-४०/एटी-०४८८ क्रमांकाच्या स्टाफ बसने ‘सर्व्हिस रोड’वरून सावनेरकडे जाण्यासाठी ‘यू टर्न’ घेतला. बसने ‘यू टर्न’ घेताच तवेरा बसच्या मध्यभागावर आदळली. त्यात तवेरातील नऊ जण गंभीर जखमी झाले.अपघात होताच परिसरातील फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. माहिती मिळताच खापरखेडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मसराम, नितेश पिपरोदे व नीलेश बिजवाड यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी सर्व जखमींना वाहनाबाहेर काढून स्वत:च्या वाहनाने लगेच नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती केले. तिथे मोहम्मद रफिक मोहम्मद शफिक अन्सारी व शेख नूर मोहम्मद शेख रहीम या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.धोकादायक ठिकाणज्या ठिकाणी हा अपघात झाला, ते ठिकाण धोकादायक आहे. कारण या ‘फ्लाय ओव्हर’लगत वस्तीशाळा, ग्रामपंचायत कार्यालय व बसस्टॉप आहे. याच परिसरात दहेगाव (रंगारी) येथील आठवडी बाजारही भरतो. त्यामुळे या परिसरात नागरिकांसोबत वाहनांची वर्दळ राहात असल्याने तसेच या मार्गावरील वाहने वगात येत असल्याने येथे वारंवार अपघात होतात.उपाययोजनेकडे दुर्लक्षकाही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका विद्यार्थिनीचा तसेच वृद्ध व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला आहे. येथे वारंवार अपघात होत असल्याने ते थांबविण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने खापरखेडा पोलिसांना पत्र देत योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजू कायम बंद करून गावातील वाहतूक ही ‘सर्व्हिस रोड’ने करावी. परिणामी, ‘यू टर्न’मुळे होणारे अपघात टळतील, असेही पत्रात नमूद केले होते. परंतु, वर्षभरापासून त्यावर कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू